नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी अर्थसंकल्प मांडला. पण हा अर्थसंकल्प तयार करताना अधिका-यांना अनेक सुरक्षात्मक स्तरातून जावे लागते. याबाबत कशी काळजी घेतली जाते, ते पाहुया…
- अर्थसंकल्प बाहेर येऊ नये म्हणून मोठी खबरदारी घेण्यात येते. अधिका-याच्या टीमला काही दिवस अर्थमंत्रालयातच रहावे लागते, एवढंच नव्हे तर या काळात कोणाच्याही संपर्कात त्यांना राहता येत नाही. अर्थसंकल्प पूर्ण मांडल्यानंतरच या अधिका-यांची सुटका केली जाते.
- हलवा सेरेमनीनंतरच अर्थसंकल्पाची छपाई केली जाते अशी परंपराच आहे. यामध्ये अनेक अर्थतज्ज्ञांची एक टीमच असते. या टीमला कोणाच्याही संपर्कात येऊ न देण्याची काळजी घेतली जाते.
- अर्थसंकल्प तयार करताना आणि त्याची छपाई करताना गुप्तता पाळली जाते. त्यामुळे संबंधिक अधिका-यांना पूर्णपणे वेगळे ठेवले जाते. या अधिका-यांना घरी जाण्याचीही परवानगी नसते. त्यांच्या जेवण आणि राहण्याची व्यवस्था दिल्लीतल्या नॉर्थ ब्लॉकमध्येच केली जाते. अधिका-यांचे मोबाईल जमा केले जातात. तसेच आतील सर्व संगणकांचा सर्वर्व्हरशी येणारा संपर्क तोडला जातो. अर्थसंकल्प सादर करताना या टीमला बाहेर सोडले जाते.
- कोरोनामुळे यंदा अर्थसंकल्पाची छपाई केली गेली नाही. त्यामुळे या वर्षी खासदारांना कागदपत्रे डिजिटल स्वरूपात देण्यात आले.
- अर्थसंकल्पाच्या संबंधित कागदपत्रे राष्ट्रपती भवनमध्ये छापली जात होती. १९५० पासून दिल्लीतील मिंटो रोड येथील छापखान्यात ही छपाई सुरू झाली. आतापर्यंत ती तेथेच होते.
- या इमारतीला सीआयएसएफचे कडक सुरक्षाकवच असते. अर्थमंत्रालयाच्या या इमारतीवर गुप्तचर खात्याची बारीक नजर असते.