नवी दिल्ली – केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत उद्या (१ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता संसदेत सादर केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभेच्या सर्वपक्षीय सदस्यांची बैठक बोलावली आहे.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ३८ विषय चर्चेसाठी घेतले जाणार आहेत. तशी माहिती संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे. यामध्ये ३३ विधेयके आणि पाच अर्थविषयक मुद्द्यांचा समावेश आहे.