नवी दिल्ली – यंदाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. ऑक्शन सिद्धांत आणि त्याच्या नव्या प्रारूपांच्या क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल यंदा हा सर्वोच्च प्रतिष्ठित पुरस्कार पॉल आर मिलग्रॉम आणि रॉबर्ट पी विल्सन यांना देण्यात आला आहे.१९६९ मध्ये या पुरस्काराची स्थापना करण्यात आली आणि आतापर्यंत ५१ वेळा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.