मुंबई – पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा विनंती अर्ज फेटाळून लावला आहे. अलिबाग न्यायालयाने गोस्वामी यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याविरोधात गोस्वामी यांनी मुंबई उत्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी झाली. कोर्टाने हा अर्ज फेटाळून लावला. तसेच, अलिबाग सत्र न्यायालयाने जामीनाच्या अर्जावर येत्या ४ दिवसात निर्णय देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले. येत्या ४ दिवसात ही सुनावणी झाली नाही तर अर्णब यांची दिवाळी कारागृहातच जाण्याची चिन्हे आहेत.