मुंबई – पत्रकार अर्णब गोस्वामी यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. अलिबाग कोर्टाने हा निर्णय दिला आहे. आर्किटेक्ट अन्वय नाईक आणि त्यांच्या आई या दोघांच्या आत्महत्येप्रकरणी अर्णब यांना अलिबाग पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे अर्णब यांना आता १८ नोव्हेंबरपर्यंत कोठडीत रहावे लागणार आआहे. दरम्यान, अर्णब यांनी याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.