मुंबई – बॉलिवूड ड्रग्स प्रकरणी नवनवीन नावे समोर येत आहेत. याप्रकरणी आता अभिनेता अर्जुन रामपाल याचेही नाव समोर येत असून एएनआयच्या माहितीनुसार, त्याची प्रेयसी गॅब्रिएला डेमेट्रियड्स हिलाही एनसीबीने बुधवारी चौकशीसाठी बोलावले होते.  गॅब्रिएला डेमेट्रियड्स हिच्या भावाला देखील एनसीबीने अटक केली होती. भावाच्या ड्रग्स कनेक्शनबद्दल तिला प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अर्जुन रामपाल याची चौकशी गुरुवारी होण्याची शक्यता आहे. चित्रपट निर्माता फिरोझ नाडियादवाला यांच्या घरी छापे टाकल्यानंतर एनसीबीने रामपाल याच्याही घरी तपास केला होता. यात काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जप्त करण्यात आल्याचे समजते. दरम्यान, अर्जुन रामपाल याच्या चालकाचीही एनसीबीने चौकशी केली आहे.
 
			







