मुंबई – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा सुद्धा यंदाच्या इंडियन प्रिमिअर लीग (आयपीएल) साठी इच्छूक आहे. मुंबई इंडियन्स संघाकडून तो खेळणार असल्याचे निश्चित झाले आहे. आहे. महान क्रिकेटपटूचा तो मुलगा असल्याने त्याची बेस प्राईज नक्की किती याची सर्वांनाच उत्सुकता होती. सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत अर्जुन खेळला होता. जो डावखुरा जलदगती गोलंदाज आणि फलंदाज आहे. तसेच तो २१ वर्षीय अष्टपैलू खेळाडू आहे. त्याची बेस प्राईज ही २० लाख रुपये इतकी होती. आज झालेल्या आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्स संघाने त्याला खरेदी केले आहे. त्यासाठी मुंबई इंडियन्सने २० लाख रुपयेच मोजले आहेत.