गुरूवार, ऑक्टोबर 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अरे व्वा ….प्रजासत्ताक संचलनात ४८ वर्षात महाराष्ट्राच्या चित्ररथाला १२ पुरस्कार

जानेवारी 23, 2021 | 7:32 am
in इतर
0
1993 scaled

 प्रजासत्ताक दिनाच्या राजपथावरील संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ नेहमीच आकर्षक ठरला आहे. सन १९७१ ते २०१९ या ४८ वर्षाच्या काळात महाराष्ट्राने ३६ वेळा चित्ररथाच्या माध्यमातून महाराष्ट्रीय परंपरेचे दर्शन घडविले आहे. आणि १२ वेळा ऊत्कृष्ट चित्ररथासाठीचा पुरस्कारही पटकाविला आहे. यंदा ‘ वारकरी संत परंपरेवर ’  आधारित चित्ररथ सादर होत आहे.

            महाराष्ट्राने सन १९७१ मध्ये ‘वारली दिंडी’ या विषयावर चित्ररथ सादर केला होता.  त्यानंतर दोन वर्षांनी १९७३ साली ‘ भारत छोडो आंदोलन ’ ही संकल्पना घेऊन या आंदोलनातील महत्वाच्या प्रसंगांचे चित्ररूप राजपथावर सादर केले होते.

 

राज्य निर्मितीपासून अवघ्या १४ वर्षात राज्यांमध्ये विविध मोठे उद्योगधंदे स्थापीत झाले १९७४ च्या चित्ररथामध्ये याच उदयोगधंदयाचे प्रतिबिंब राजपथावर दिसले. पुढे १९७८ मध्ये ‘विविधतेत समानता’ असा चित्ररथ राजपथावर झळकला. तर वर्ष १९७९ मध्ये ‘बाल विकास ’ या विषयावर चित्ररथाच्या माध्यमातून बालविकासाचे धोरण दर्शविले.

महाराष्ट्रामधील भौगोलिक भागानुरूप विविध सण साजरे केले जातात, असाच विषय धरून १९८० ‘ महाराष्ट्रातील सण ’ असा  चित्ररथ साकारण्यात आला.  वर्ष  १९८१ आणि अलीकडे २०१८ मध्ये ‘ छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक’ अशा ऐतिहासिक विषयावर चित्ररथ राजपथावर झळकला.  दोन्ही वेळी या संकल्पनेच्या चित्ररथाला प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले हे विशेष.

2018 photo 1

 

सन १९८२ मध्ये राज्यातील समृद्ध  ‘लोककला’ विषयावरील चित्ररथाने राजपथावरील प्रेक्षकांची मने जिंकली. राज्यात साजरा होणारा  ‘बैलपोळा’ हा सण विशेष आहे. याच सणावर वर्ष १९८३ मध्ये आधारीत चित्ररथ दर्शविण्यात आला.

 

लोकमान्य टिळकांवर आधारित विविध विषयांवर ४ वेळा  चित्ररथ

2017 scaled

भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांचे भारतीय स्वातंत्र चळवळीत विशेष महत्व आहे. लोकमान्य टिळकांवर आधारीत चित्ररथ राजपथावर वेगवेगळया विषयाला धरून उभारण्यात आले. प्रथम सन १९८४ आणि नंतर सन २०१७  मध्ये लोकमान्य टिळकांची सिंहगर्जना  ‘स्वराज माझा जन्म सिद्ध अधिकार आहे ’ या घोषणेवर आधारीत  चित्ररथ उभारण्यात आला. या चित्ररथाला दोनही वेळा व्दितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वर्ष १९८८ मध्ये ‘लोकमान्य टिळकांवरील ऐतिहासकि खटला’ तर वर्ष १९९३ मध्ये ‘लोकमान्य  टिळाकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाचे शताब्दी वर्ष’ विषयावर चित्ररथ  होता. यापैकी  १९९३ च्या चित्ररथाने प्रथम पुरस्कार पटकाविला.

वर्ष १९८६ मध्ये स्वातंत्र्य मिळुन चाळीस वर्ष झाली होती, या निमत्ताने ‘स्वातंत्र्य संग्रामातील महाराष्ट्राचे योगदान’ असा चित्ररथ राजपथावर सादर करण्यात आला. सन १९९० मध्ये  पुन्हा एकदा ‘लोककला’ या विषयावर चित्ररथ राजपथावर दर्शविण्यात आला. वर्ष  १९९१  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शताब्दी वर्षानिमित्ताने चित्ररथ उभारण्यात आला. ‘वारली तारपा नृत्य ’ असा चित्ररथ सण १९९२  मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात दिसला.

‘हापूस’ आंबा

1994 scaled

आंब्यांचा राजा ‘हापूस आंबा’ या संकल्पनेवर सण १९९४ मध्ये चित्ररथ  साकारण्यात आला. महात्मा गांधीजीच्या १२५ व्या जयंती वर्षामध्ये राज्याने वर्ष १९९६ ला ‘बापु स्मृती’ असा चित्ररथ दर्शविण्यात आला. वर्ष १९९७ ला चित्रपट सृष्टीने शंभरी पुर्ण केली होती. याची आठवण म्हणुन ‘चित्रपट सृष्टीचे शंभर वर्ष ’ अशा संकल्पनेवर चित्ररथ साकारण्यात आला.

वर्ष  १९९६ मध्ये  ‘महिला बालविकास ’ अशा महत्वपुर्ण विषयावर चित्ररथ तयार करण्यात आला. वर्ष १९९९‘मुंबई देशाची आर्थिक राजधानी ’ दर्शविणार चित्ररथ राजपथावर झळकला. राज्याची ओळख ठळकपणे दर्शविणारे ‘साखर कारखाने’ यावर आधारित २००१ मध्ये चित्ररथ साकारण्यात आला. गोकुळ अष्टमीला दही हंडी फोडणारे गोविंदा यांच्यावर ‘ गोविंदा आला ’ अशी संकल्पना घेऊन २००२ ला चित्ररथ दर्शविणत आला. सन २००३ मध्ये  ‘आदिवासी वारली  चित्रकला’ असा आदिवासी जीवनावर आधारित चित्ररथ  आकारण्यात आला.

धनगर

2009 scaled

महाराष्ट्राचा स्थापत्य ठेवा असलेल्या अंजता लेणी यावर आधारित सण २००४ ला ‘अजंता लेणींमधील काही लेणींची   भीत्तीचित्रे  चित्ररथात दर्शविण्यात आली. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या  ‘ ग्रामस्वच्छता अभियान’ योजनेवर आधारीत चित्ररथ सण २००६मध्ये साकारण्यात आला.  राज्याची मध्ये भरणारी महत्वाची धार्मिक जत्रा ‘जेजुरीचा खंडेराया ’ या संकल्पनेचा चित्ररथ वर्ष २००७ मध्ये चित्ररथ दर्शविण्यात आला. पुढे २००९ ला  ‘ धनगर ’ असा विषय घेऊन चित्ररथ उभारण्यात आला. वर्ष २०१० ला जगाचे लक्ष वेधणारा ‘ मुंबईचा डबेवाला ’ या संकल्पनेवरील चित्ररथ साकारण्यात आला.

‘पंढरीची वारी’

2015 scaled

महाराष्ट्राचे नृत्य ‘लावणी ’ यावर चित्ररथ २०११ मध्ये दर्शविण्यात आला, या चित्ररथाला  प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. वर्ष २०१२ मध्ये वेरूळ लेणीमधील ‘कैलास मंदीर’ या विषयावरील चित्ररथ उभारण्यात आला होता. सन २०१४ मध्ये कोकाणातील मच्छीमारी समुहातील असणारा महत्वपुर्ण  सण ‘ नारळी पोर्णीमा’ या विषयावर चित्ररथ साकाराण्यात आला. वर्ष २०१५ मध्ये राज्याची शतकांची परंपरा  ‘पंढरीची वारी’ या वारीच्या विषयावर आधारित चित्ररथाने राजपथावर भक्तीमय वातावरण निर्माण केले. सण २०१९ महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्त  ‘भारत छोडो ’ आंदोलनवर आधारित चित्ररथ साकारण्यात आला.

आतापर्यंत महाराष्ट्राच्या १२ चित्ररथांना विविध पुरस्कार

महाराष्ट्राला लाभलेल्या वैविध्यपुर्ण सांस्कृत‍िक-सामाजिक, पर्यटन आदि विषयांवर चित्ररथ सादर करण्याची संधी मिळालेली आहे. यात राज्याने १२ वेळा पुरस्कार पटकावले आहे. वर्ष १९९३ ते १९९५ पर्यंत सलग तीन वेळा प्रथम पुरस्कार पटकावून विक्रम निर्माण केला आहे. आतापर्यंत महाराष्ट्राला ७ वेळा प्रथम पुरस्कार मिळालेले आहेत. तीन वेळा द्वितीय पुरस्कार व दोन वेळा तृतीय पुरस्कार मिळाला आहे.

वर्ष १९८१   आणि २०१८ मध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेका’वर आधारित चित्ररथाला प्रथम पुरस्कार मिळाला होता. महाराष्ट्रात पोळा या सणाला विशेष महत्व आहे बैलपोळा मोठया उत्साहात साजरा केला जातो याच विषयावर आधारीत वर्ष  १९८३ च्या चित्ररथाला प्रथम पुरस्कार देण्यात आले होते. वर्ष १९९३ मध्ये ‘लोकमान्य  टिळाकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाचे शताब्दी वर्ष’ या चित्ररथालाही वर्ष १९९४ ला फळाचा राजा ‘हापूस आंबा’ या चित्ररथाला आणि वर्ष १९९५ मध्ये ‘बापू स्मृती’ या चित्ररथाला असे सलग तीनदा प्रथम पुरस्कार मिळाला. ‘पंढरीची वारी’  या चित्ररथाला वर्ष २०१५ मध्ये प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले.

महाराष्ट्राने स्वातंत्र्य संग्रामात कश्या प्रकारे भाग घेतले होते यावर आधारीत वर्ष १९८६ च्या चित्ररथाला दुसरे पारितोषिक मिळाले होते. वर्ष १९८८ मध्ये ‘लोकमान्य टिळकांवरील ऐतिहासिक खटला’ या चित्ररथाला दुसरे पारितोषिक मिळाले वर्ष २००९ मध्ये राज्यातील ‘धनगर’ समाजाची संस्कृती दर्शविणा-या चित्ररथाने दूसरे पारितोषिक मिळाविले. तर वर्ष २००७ मध्ये ‘जेजुरीचा खंडेराया’ या चित्ररथास तिसरे पुरस्कार मिळाले. वर्ष २०१७ मध्ये लोकमान्य टिळाकांच्या योगदाणावर आधारित ‘बाळगंगाधर टिळक’ या चित्ररथाला तीसरा क्रमांक मिळालेला होता.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

वारली चित्रशैली – शाश्वत लोककलेचा व्यापक परीघ…

Next Post

व्यंगचित्र – गजरमल काकांचे फटकारे

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

MOBILE
मुख्य बातमी

दिव्यांगांसाठी खुषखबर… हे ॲप डाऊनलोड करा आणि सरकारी योजनांचा लाभ घ्या…

ऑक्टोबर 15, 2025
Rural Hospital PHC 1
महत्त्वाच्या बातम्या

अजूनही कुटुंब जिवंत आहे… लहान भावाने वाचवले मोठ्या भावाचे प्राण…

ऑक्टोबर 15, 2025
IMG 20251015 WA0053
महत्त्वाच्या बातम्या

सिंहस्थ कामांचा शुभारंभ… या रस्त्यावरील अतिक्रमणे जमीनदोस्त…

ऑक्टोबर 15, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
इतर

असा असेल तुमचा १६ ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या गुरुवारचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 15, 2025
maha gov logo
महत्त्वाच्या बातम्या

नांदूरमध्यमेश्वरच्या ‘त्या’ जागेच्या प्रकरणात खळबळजनक बाब समोर… तहसिलदारांसह उपअधिक्षकांचे काय होणार?

ऑक्टोबर 14, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

दिवाळीपूर्वीच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय…

ऑक्टोबर 14, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा बुधवारचा दिवस… जाणून घ्या १५ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 14, 2025
महत्त्वाच्या बातम्या

हुश्श… नाशिक शहराने घेतला मोकळा श्वास… खडबडून जागे झालेल्या महापालिकेने केली एवढी कारवाई…

ऑक्टोबर 13, 2025
Next Post
IMG 20200912 WA0035 1 e1600520163242

व्यंगचित्र - गजरमल काकांचे फटकारे

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011