रविवार, ऑगस्ट 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अरे वाह, वीजबिल ‘ऑनलाईन’ भरण्याला पसंती, ५ लाख ८७ हजार ग्राहकांनी भरले ११७ कोटी

by Gautam Sancheti
मार्च 31, 2021 | 7:34 am
in स्थानिक बातम्या
0
mahavitran 1

नाशिक –   लघुदाब वर्गवारीतील वीजग्राहकांना घरबसल्या वीजबिलांचा भरणा करण्याची ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध करून दिल्यानंतर सद्यस्थितीत महावितरणचे राज्यात ६५ लाख वीजग्राहक दरमहा सरासरी १,४१६ कोटी रुपयांच्या वीजबिलांचा ‘ऑनलाईन’ भरणा करीत आहेत.  यामध्ये नाशिक मंडलात ३लाख ३८ हजार ग्राहकांनी ७० कोटी, मालेगाव मंडळात ४९ हजार ग्राहकांनी ८ कोटी ३८ लाख तर अहमदनगर मंडळात १लाख ९९ हजार ग्राहकांनी ३८ कोटी ६३ लाख रुपयांचा अशाप्रकारे नाशिक परिमंडळात एकूण ५ लाख ८७ हजार ग्राहकांनी ११७ कोटी ६८ लाख रुपयांचा भरणा केला आहे. 
महावितरणची वेबसाईट व मोबाईल अॅप तसेच अन्य पर्यायांद्वारे ‘ऑनलाईन’ वीजबिल भरणा क्रेडीट कार्ड वगळता निःशुल्क करण्यात आला आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या काळात वीजबील भरणा केंद्राच्या लाईनमध्ये  उभे राहणे किंवा गर्दी टाळून घरबसल्या कोणत्याही वेळेत ‘ऑनलाईन’ वीजबिल भरण्याची सोय वीजग्राहकांना उपलब्ध आहे. 
महावितरणने लघुदाब वीजग्राहकांसाठी ‘ऑनलाईन’ बिल भरण्यासाठी www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच जून २०१६ पासून मोबाईल अॅपद्वारे चालू व मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा ‘ऑनलाईन’ भरणा करण्यासाठी नेटबॅकींग, क्रेडीट/डेबीट कार्डासह मोबाईल वॅलेट व कॅश कार्ड्सचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. वीजग्राहकांना त्यांच्या एकाच खात्यातून स्वतःच्या अनेक वीजजोडण्यांबाबतही सेवा उपलब्ध आहे. त्यामुळे वीजबिल भरणा केंद्रात जाऊन रांगेत उभे राहण्याऐवजी ‘ऑनलाईन’ वीजबिल भरण्यास वीजग्राहकांची पसंती वाढलेली आहे. 
लघुदाब वीजग्राहकांसाठी ‘ऑनलाईन’ बिल भरण्यासाठी दरमहा ५०० रुपयांच्या मर्यादेत ०.२५ टक्के सूट देण्यात येत आहे. क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड, युपीआय, भीम, इंटरनेट बॅकींग, मोबाईल वॉलेट, मोबाईल बॅकिंगद्वारे वीजबिल भरणा केल्यास वीज देयकामध्ये ०.२५टक्के सूट देण्यात येत आहे. याआधी नेटबॅकींगचा अपवाद वगळता वीजबिलांचा ‘ऑनलाईन’ भरणा करण्यासाठी 500 रुपयांपेक्षा अधिक रकमेवर शुल्क आकारण्यात येत होते. परंतु क्रेडीटकार्ड वगळता नेटबॅकिंग, डेबीटकार्ड, कॅशकार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून ‘ऑनलाईन’द्वारे होणारा वीजबिल भरणा आता निःशुल्क आहे. 
‘ऑनलाईन’द्वारे वीजबिल भरणा केल्यानंतर लगेचच ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’ द्वारे पोच देण्यात येत आहे. याशिवाय महावितरणच्या वेबसाईटवर व मोबाईल अॅपवर मागील वर्षभराच्या महिन्यांतील बिलांचा तपशील व रक्कम भरल्याची पावती उपलब्ध आहे. यासोबतच लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांचे वीजबिल १० हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी या ग्राहकांच्या वीजबिलांवर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील देखील देण्यात येत आहे. 
सद्यस्थितीत कळवण विभागात ९ हजार १५८ ग्राहकांनी १ कोटी ६२ लाख, मालेगाव विभागात १० हजार ६२८ ग्राहकांनी २ कोटी २ लाख, मनमाड विभागात १९ हजार ३६९ ग्राहकांनी ३ कोटी २० लाख तर सटाणा विभागात १० हजार २८४ ग्राहकांनी १ कोटी ५२ लाख  अशा प्रकारे मालेगाव मंडळात एकूण ४९ हजार ४३९ ग्राहकांनी ८ कोटी  ३८ लाख रुपयांचा भरणा केला आहे. यासोबतच चांदवड विभागातील २४ हजार ५२० ग्राहकांनी ४ कोटी ५२ लाख, नाशिक ग्रामीण विभागातील ५४ हजार ३७९ ग्राहकांनी ११ कोटी ७३ लाख, नाशिक शहर विभाग १ मध्ये ९१ हजार ७१९ ग्राहकांनी २८ कोटी ३ लाख आणि नाशिक शहर विभाग २ मध्ये १ लाख ६७ हजार ८११ ग्राहकांनी २६ कोटी ३७ लाख रुपये या प्रमाणे नाशिक मंडळामध्ये ३ लाख ३८ हजार ४२९ ग्राहकांनी ७० कोटी ६६ लाख  रुपयाचा ‘ऑनलाईन’द्वारे वीजबिलांचा भरणा करीत आहे. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने वीजग्राहकांनी आरोग्यविषयक काळजी घेत रांगेत किंवा गर्दीच्या ठिकाणी जाऊन इतर व्यक्तींच्या संपर्कात येण्याऐवजी एका क्लिकवर उपलब्ध असलेल्या ‘ऑनलाईन’ सोयीद्वारे घरबसल्या वीजबिलांचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – कामटवाडे आणि सौभाग्यनगर मधील दुकाने सील; नाशिक पोलिसांची कारवाई

Next Post

पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर १ एप्रिलपासून ५ टक्के दरवाढ लागू, वाहन धारकांत नाराजी

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

GzFrSrPWAAAt v1
महत्त्वाच्या बातम्या

IADWS ची पहिली उड्डाण चाचणी यशस्वीरित्या पार…संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली माहिती

ऑगस्ट 24, 2025
Untitled 41
संमिश्र वार्ता

विशेष लेख…उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक रंगणार दक्षिण विरुद्ध दक्षिण

ऑगस्ट 24, 2025
crime1
क्राईम डायरी

दुचाकी अडवून चाकूचा वार करुन दोघांनी हॉटेल व्यावसायीकाला लुटले…नाशिकमधील भररस्त्यावरील घटना

ऑगस्ट 24, 2025
ed
संमिश्र वार्ता

ईडीने विशेष न्यायालयाच्या आदेशाने जप्त केलेली ४५.२६ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता केली परत…नेमकं काय आहे प्रकरण

ऑगस्ट 24, 2025
Untitled 40
संमिश्र वार्ता

मराठी लोक भंगार है म्हणणा-या परप्रांतीयला मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला चोप…नाशिकमधील घटना

ऑगस्ट 24, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

शिंदे यांच्या तातडीच्या निरोपानंतर नाराज तानाजी सावंत मुंबईत दाखल, दोन तास चर्चा…नेमकं घडलं काय

ऑगस्ट 24, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी झटपट लाभाचा मार्ग तूर्तास टाळावा, जाणून घ्या, रविवार, २४ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 23, 2025
IMG 20250823 WA0414 1
स्थानिक बातम्या

‘करघा पैठणी द क्वीन ऑफ सारीज’ या चित्रपटाचे येवल्यात स्पेशल स्क्रिनिंग…मंत्री छगन भुजबळ यांची उपस्थिती

ऑगस्ट 23, 2025
Next Post
IMG 20191202 114555 1 scaled

पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर १ एप्रिलपासून ५ टक्के दरवाढ लागू, वाहन धारकांत नाराजी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011