कला शिक्षकाने साकारला पर्यावरवणपूरक देखावा
नांदगाव – कोरोना महामारीच्या काळात उद्योगधंदे काही दिवस बंद असल्याने निसर्गाने यंदा मोकळा श्वास घेतला. नांदगाव येथील व्ही.जे. हायस्कूलचे कलाशिक्षक विजय चव्हाण यांनी याच संकल्पनेवर आधारित देखावा राहत्या घरी साकारला आहे. गेल्या आठ वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी चव्हाण आग्रही असतात. नाविण्यपूर्ण संकल्पनेच्या माध्यत्मातून वेगवेगळे उपक्रम राबवून पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी जनजागृतीचे काम चव्हाण दरवर्षी करतात. यंदाच्या वर्षी आपल्या राहत्या घरी निसर्ग मोकळा श्वास घेत असल्याचा देखावा त्यांनी साकारला आहे. परिसरातील नागरिकांनी देखील शाडूच्या बाप्पाची मूर्ती बसवावी यासाठी ते प्रोत्साहन देत असतात.
गणपतीची आरास पूर्णपणे पर्यावरणपूरक पद्धतीने तयार केली आहे. सजावटीसाठी कागद, पुठ्ठा, कापड, माती, रोपटे, धान्य इत्यादी साहित्याचा वापर करण्यात आला आहे. दर वर्षी गणपती आरास मधून अनोखा संदेश देण्याचा प्रयत्न ते करत असतात. यंदा कोरोना महामारीमुळे देश अनेक दिवस लॉकडाऊन मध्ये होता. या काळात मनुष्याचे फार मोठे नुकसान झाले हे खरे असले तरी त्यामुळे पर्यावरणात का
ही प्रमाणात सुधारणा झाली आहे. निसर्गाने सुद्धा या काळात मोकळा श्वास घेतला आहे. देखाव्यात नारळाचे झाडे, निसर्गरम्य धरण परिसर, डोंगरातले धबधबे, प्राणी तसेच नारळाच्या झाडा जवळ फोडलेले नारळ दाखवून त्यात गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. देखाव्यातून या सुधारलेल्या पर्यावरणाचे रूप दाखवण्यात आले आहे. उत्सवातुन पर्यावरणाला धोका पोहोचणार नाही याची काळजी घेत गणपती विसर्जन घरच्या घरी करून गर्दी टाळणे व पर्यावरणाचे संगोपन करण्याचा संदेश देण्यात आलं आहे.