नाशिक – कोरोना महामारीच्या काळात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी भारत सरकारतर्फे भविष्य निधी योजेने अंतर्गत सभासदांसाठी ‘प्रयास’ योजनेची सुरुवात करण्यात आली. ५८ वर्ष पूर्ण झाल्यावर सेवानिवृत्तीच्या दिवशी कर्मचाऱ्यांची पेन्शन सुरु होते. संबंधित पेन्शन ऑर्डर निवृत्तीच्या दिवशी दिली जाते. नाशिक भविष्य निधी कार्यालयाने या योजनेचा शुभारंभ केला असून या महिन्यात निवृत्त होणाऱ्या काही EPS सभासदांचे पेन्शन क्लेम पास केले आहे. क्षेत्रिय भविष्य निधी आयुक्त एम. अशरफ यांच्या हस्ते पेन्शन पेमेंट ऑर्डरचे वाटप करण्यात आले. निवृत्त होणाऱ्या महिन्याच्या सुरुवातीला आपले फॉर्म कार्यालयाकडे पाठवावे तसेच योजनेचा फायदा करून घ्यावा असे आवाहन अशरफ यांनी केले. योजनेसाठी सभासदास ज्या महिन्यात निवृत होणार असेल त्या महिन्याच्या सुरवातीला त्याचा क्लेम फॉर्म (10D) कंपनीतर्फे भविष्य निधी कार्यालयात पाठवावा लागतो त्यानंतर भविष्य निधी कार्यालय त्याचा पेन्शन फॉर्म पास (सेटल) करून पेन्शन पेमेंट आदेश (PPO) दिला जातो. शहरात असलेल्या भविष्य निधी कार्यालयात योजनेची सुरुवात झाली आहे.