फलक रेखाटन – जागतिक चिमणी दिवस – २० मार्च
चांदवड – प्रत्येक माणसाचे बालपण चिऊताईच्या आठवणीशी जोडले आहे. अलीकडे वाढते शहरीकरण,प्रदूषण,रासायनिक खते व किटनाशकांचा बेसुमार वापर,मोबाईल टॉवर्स,यामुळे चिमण्यांची संख्या घटत चालली आहे. त्यामुळे अन्नसाखळी घोक्यात येत आहे. चिमण्यांचे संरक्षण व्हावे त्यांचे संवर्धन होऊन त्यांची संख्या वाढ व्हावी यासाठी लोकांमध्ये जनजागृती म्हणून हा दिवस प्रत्येक वर्षी ‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून साजरा होतो. अशीच जनजागृती अनोख्या पध्दतीने चांदवड तालुक्यातील भाटगाव येथील नूतन माध्यमिक शाळेतील कलाशिक्षक देव हिरे यांनी फलक रेखाटनाने केली आहे.
चिमणी वाचविण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या घराजवळ,गच्चीवर धान्य,पाणी ठेवणे,खोपे तयार करणे,कीटक नाशकाचा वापर योग्य प्रमाणात करणे ,शिकार न करणे, यामुळे चिमण्यांची संख्या वाढेल व पुन्हा सर्वत्र चिवचिवाट ऐकू येईल यासाठी हिरे यांचा फलक रेखाटनातून जनजागृती उपक्रम कौतुकास्पद आहे.