नाशिक – म्हसरूळ – आडगाव लिंक रोडवर असलेल्या एका रेस्टॉरंट मध्ये केक ऐवजी कलिंगड कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. १९८८ बॅच चे जुने मित्र त्यानिमित्त भेटले होते. चार पाच दिवसांपूर्वीच व्हॉटस् अप वर “केक ऐवजी फळे कापा”, ही पोस्ट होती. त्यानंतर हा वाढदिवसा त्याच पध्दतीने साजरा करण्यात आला. खरं तर वाढदिवस साजरा करण्याची प्रत्येकाची पध्दत वेगळी असते. पण, त्यात आता केक मात्र बहुतांश ठिकाणी असतो. पण, त्याला फाटा देत हा कलिंगड कापून वाढदिवस साजरा करण्याचा प्रकार निश्चितच कौतुकास्पद आहे. बघा त्याचा हा व्हिडिओ…..