नाशिक – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता वाघाड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना एफ एम रेडिओचे वाटप करण्यात आले. शाळाबंदीच्या काळात विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येवूनये यादृष्टीने हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. सोशल नेटवर्किंग फोरमच्या माध्यमातून ‘गाव तेथे ग्रंथालय’ याउपक्रमा अंतर्गत ग्रंथालयाचे देखील उदघाटन करण्यात आले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना मोफत लेखनसाहित्य वाटप करण्यात आले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शाळाबंद असल्याने विद्याथ्यांचा अभ्यास थांबू नये यासाठी एफ एम रेडिओचे वाटप करण्यात आले. जयदीप गायकवाड यांच्या संकल्पनेतून शाळेतील विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू तसेच वाचनालयासाठी पुस्तके देण्यात आले. त्याचप्रमाणे सुरक्षेच्या दृष्टीने सँनिटायझरचे वाटप करण्यात आले. सोशल नेटवर्किंग फोरमच्या माध्यमातून संकलित केलेली पुस्तके तसेच शाळेच्या माध्यमातून उपलब्ध झालेली पाठयपुस्तके ग्रंथालयात उपलब्ध असून विद्यार्थ्यांना याचा उपयोग होणार आहे. याप्रसंगी निगडोळ केंद्राचे केंद्रप्रमुख मोतीराम पवार, शा.व्य.स.अध्यक्ष, मुख्याध्यापक व शिक्षक, ग्रामसेवक तसेच ग्रामस्थ प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित होते