हैदराबाद – आंध्र प्रदेशातील राजामहेंद्रवरम येथील ४७ वर्षीय महिलेला नव्या कोरोना विषाणूच्या संसर्गाची लागण झाली आहे. ही महिला ब्रिटनहून विमानाने नवी दिल्लीला आली आणि तेथून ट्रेनमध्ये आंध्र प्रदेशला पोहोचली. तथापि, राज्यात आरोग्य विषाणूचे नवीन संक्रमण पसरलेले नाही, असे राज्य आरोग्य विभागाने म्हटले आहे.
राज्याचे आरोग्य आयुक्त कट्टमनेनी भास्कर यांनी हैदराबादच्या सेन्टर फॉर सेल्युलर अणि आण्विक जीवशास्त्र (सीसीएमबी) च्या अहवालाचे हवाला देऊन सांगितले की, ब्रिटनहून परत आलेल्या १२ प्रवाश्यांना संसर्ग झाल्याची बाब उघड झाली आहे आणि त्यापैकी एका महिलेलाच नवीन विषाणूची लागण झाली आहे. मात्र या महिलेच्या मुलास संसर्ग झाले नाही. या महिलेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीलाही हा संसर्ग झाल्याची उद्याप उघड झालेले नाही. ”२१ डिसेंबर रोजी ब्रिटनहून भारतात आलेली ही महिला आंध्र प्रदेश एक्स्प्रेसने आली. तीच्या समवेत एकाच डब्यात प्रवास करणाऱ्या अन्य आठ प्रवाशांची तपासणी केली गेली पण त्यापैकी कोणालाही संसर्गाची पुष्टी झाली नाही. विशाखापट्टणममध्ये पोहोचल्यानंतर या प्रवाशांची तपासणी करण्यात आली.
दरम्यान, भास्कर पुढे म्हणाले की, अलिकडच्या काळात ब्रिटनहून १४३२ लोक राज्यात आले होते आणि त्यापैकी १४०६ जणांचा शोध घेण्यात आला आहे.