यासंबंधी माहिती देताना इथिओपियन मानवाधिकार आयोगाने सांगितले की, बेनिशुंगुल-गुमुझ या पश्चिम प्रादेशिक राज्यातील मेटेकेल भागातील बेकोजी या गावात हा रक्तपात झाला. या लोकांना दफन करण्यात आले. सशस्त्र हल्लेखोरांनी झोपेत असताना सामान्य लोकांच्या घरांवर अंदाधुंद गोळीबार केला. या परिसरातील परिस्थिती सतत खालावत आहे आणि मानवाधिकार पायदळी तुडवले जात आहेत. तसेच अलिकडच्या काळात हल्ल्यांमध्ये वाढ होत आहे.
इथिओपियातील हा हल्ला वांशिक हिंसाचाराचा परिणाम असल्याचे समजते. पंतप्रधान अबे अहमद यांनी या हल्ल्याचे वर्णन नरसंहार म्हणून केले आहे. मध्यवर्ती सैन्याने या भागात रवानगी करण्यात आली असून सैन्याने आतापर्यंत ४२ बंडखोरांना ताब्यात घेतले आहे. मात्र अबे अहमद यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर इथिओपियातील परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे लोक ४० हजाराहून अधिक लोक आपली घरे सोडून पळून गेले आहेत.