लखनऊ – अयोध्या येथील प्रस्तावित राम मंदिराचा नकाशा आणि संपूर्ण मंदिर परिसराचा आराखडा अयोध्या विकास प्राधिकरणाने गुरुवारी (३ सप्टेंबर) एकमताने मंजूर केला आहे. त्यामुळे या मंदिराच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
आता हे बांधकाम केव्हाही सुरू होणार आहे. मंदिर परिसराकरिता २ लाख ७४ हजाराहून अधिक चौरस मीटर्स आणि राम मंदिरासाठी १३ हजार चौरस मीटरचा आराखडा तयार करण्यात आला आहे. श्री राम जन्मभूमी तीर्क्ष क्षेत्राचे सदस्य अनिल मिश्रा यांनी २९ ऑगस्ट रोजी आवश्यक कागदपत्रांसह हा नकाशा मंजुरीसाठी सादर केला होता.
प्रस्तावित मंदिराची हे काही संकल्पचित्र