दुबई – आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) बैठक अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षतेखालील या आठवड्यात येथे होणार आहे. या बैठकीत वादग्रस्त अम्पायर्स कॉलवर चर्चा होणार आहे. यावर भारताचा कर्णधार विराट कोहलीसह अनेक खेळाडूंनी टीका केली होती. चेंडूचा कितीही भाग स्टंपवर स्पर्श करत असेल तर त्याला अंपायर्स कॉलचा प्रयोग केला जावा, असा निर्णय या बैठकीत होऊ शकतो.
आयसीसी क्रिकेट मंडळाची बैठक ३० मार्चला इथं होणार आहे. त्याच दिवशी मुख्य कार्यकारी अधिकारी मनू साहनी यांच्याबाबतही चर्चा होईल. साहनी सध्या सुट्टीवर आहेत. त्यांची कर्मचार्यांशी खूप कठोर वागणूक असल्याचं एका अंतरिम चौकशीत समोर आलं होतं. बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकार्यांनी सांगितलं, की या आठवड्याच्या अखेर त्रैमासिक बैठक होणार आहे. त्यामध्ये अंपायर्स कॉलवरही चर्चा होईल. मुख्य कार्यकारिणीचीही बैठक होणार आहे.










