नवी दिल्ली – प्रेम एकाशी अन् लग्न दुसऱ्याशी किंवा दुसरीशी असा प्रकार अनेक वेळा घडतो, असा प्रकार अमेरिकेत घडला त्याचे अमेरिकेत लिव्ह इन रिलेशनशिप होते अन् भारतात एकीशी लग्न झाले ही घटना उघड झाल्याने खळबळ उडाली.
ग्वाल्हेर येथील रहिवासी असलेल्या मुलीचे लग्न ६ फेब्रुवारी २०१७ रोजी कोटा येथील रहिवासी युवकाशी झाले होते. तो अमेरिकेत असून टीसीएस कंपनीत सॉफ्टवेअर अभियंता आहे. लग्न झाल्यानंतर ती महिला जेव्हा सासरच्या घरी पोहचली, तेव्हा पतीने सुट्टी घेतली होती, परंतु १४ दिवसांनंतर व्हिसा मिळेल, नंतर पत्नीला नेतो, असे सांगून तो अमेरिकेत परतला. मात्र अमेरिकेत गेल्यानंतर त्याने आपल्या पत्नीशी संपर्क साधणे बंद केले आणि नंबरही ब्लॉक केले.
मात्र फेसबुक मित्राशी संपर्क साधला असता कळले की, त्याचा आधीच अमेरिकेत अकी नावाच्या मुलीशी लिव्ह इन रिलेशनशिपचे संबंध आहे. या प्रकरणी विश्वासघात झाल्यानंतर नोव्हेंबर २०१७ मध्ये त्या महिलेने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता.
