मेलबर्न : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या निवडीच्या वादानंतर आता ‘जो’ नावाच्या कबुतरामुळे ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका यांच्यात वाद निर्माण झाला. विशेष म्हणजे या कबुतराने अमेरिकेच्या ओरेगॉनहून उड्डाण करीत १३ हजार किमी अंतरावर पार केले आणि २६ डिसेंबर रोजी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न गाठले. तेव्हा त्याच्या पायावर बांधलेली पट्टी पाहून तेथील अधिकाऱ्यांनी संसर्गजन्य रोगाचा धोका म्हणून ठार मारण्याचा निर्णय घेतला.
ऑस्ट्रेलियाने या कबूतरापासून संसर्गजन्य रोगाचा फैलाव होऊ शकतो, या कारणास्तव जिवे मारण्याचा निर्णय घेतला. सदर कबूतर अन्न सुरक्षा सह अन्य समस्या निर्माण करू शकतो. यानंतर अमेरिकेच्या ओक्लाहोमा येथील रेसिंग कबूतर युनियनचे मॅनेजर डायन रॉबर्ट्स म्हणाले की, कबूतरच्या पायाला बांधलेली बँड बनावट होती. अमेरिकेच्या ब्लू बार कबूतरास हा बँड बांधला असून तो ऑस्ट्रेलियाने पकडलेला कबूतर नाही. अशा परिस्थितीत त्याला मारले जाऊ नये. कारण पशुपक्ष्यांना देखील जगण्याचे स्वातंत्र्य आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या कृषी विभागाला तपासणीत असे आढळले की, जो नावाच्या या कबुतराच्या पायाला बनावट बँड बांधला होता. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या विजयाच्या आनंदात एखाद्याने कबूतरच्या पायाला पट्टी बांधली आणि ती उडवून दिली, त्यामुळे गोंधळ उडाला, असेही या तपासणीत उघड झाले आहे. असेही म्हटले जात आहे की, सदर कबूतर ऑस्ट्रेलियाचा असून त्यापासून कोणताही धोका नाही. आता कबूतरविरूद्ध कोणतीही कारवाई होणार नाही. ऑस्ट्रेलियामध्ये सापडलेला हा कबूतर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. अमेरिकेच्या व्हिक्टोरियाच्या अॅनिमल जस्टिस पार्टीचे वकील अॅन्डी मेडिक म्हणाले की, जो नावाच्या कबुतराला स्वतंत्रपणे जगण्याचा हक्क देण्यात यावा. जो याच्या बँडने हे सिद्ध केले आहे की, तो अमेरिकन नाही आणि कोणत्याही परिस्थितीत त्याला मारण्याची गरज नाही.