नवी दिल्ली – अमेरिकेतील चिन्मय आणि प्रज्ञा पाटणकर यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तोंडभरुन कौतुक केले आहे. मन की बात या कार्यक्रमात ते बोलत होते. मल्लखांब अनेक देशात प्रसिद्ध आहे. अमेरिकेत चिन्मय आणि प्रज्ञा यांनी त्यांच्य घरातच मल्लखांब शिकविण्यास प्रारंभ केला. हळूहळू प्रतिसाद वाढला आणि आता अनेक ठिकाणी ते मल्लखांब प्रशिक्षण केंद्र चालवित असल्याचे मोदी यांनी सांगितले. ही बाब अभिमानास्पद असल्याचे ते म्हणाले.
दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी होणाऱ्या मन की बात मध्ये मोदी हे विविध विषयांवर भाष्य करतात. मोदी म्हणाले की, ‘न हि ज्ञानेन सदृष्यं पवित्र मिह विद्यते’ अर्थात, ज्ञानासारखं, जगात काहीच पवित्र नाही. ज्ञानाचा प्रसार करणारे, त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या सर्व महोदयांचं मी, मनापासून अभिनंदन करतो. बापूजींनी सरदार पटेल यांच्या विषयी म्हटलं होतं की, त्यांच्या विनोदी गप्पा गोष्टी मला एवढ्या हसवतात की हसून हसून माझे पोट दुखायला लागते. याच्यात आपल्यासाठी शिकवण आहे की कितीही वाईट परिस्थिती असेल तरीही आपली विनोदबुद्धी जागृत ठेवायला हवी, असं पंतप्रधान म्हणाले.
आम्हाला नेहमीच आपल्या सर्जनशीलतेने, प्रेमाने, प्रत्येक क्षणी, प्रयत्नपूर्वक, एक भारत श्रेष्ठ भारत, हे तत्व सुंदर रंगात साकार करायचे आहे. काश्मिर खोरे, संपूर्ण देशभरातील, ९० टक्के पेन्सिल स्लेट, लाकडी पट्टीची मागणी पुरी करते आणि त्यात देखील खूप मोठा भाग पुलवामाचा आहे. एक काळ असा होता की जेव्हा आपण विदेशातून पेन्सिली साठी लाकूड मागवत होतो. पण आता आमचा पुलवामा, देशाला आत्मनिर्भर बनवतो आहे, असे त्यांनी सांगितले.