नवी दिल्ली – अमेरिकेच्या लस उत्पादन करणा-या फायझरने कंपनीने ‘ना नफा ‘ या तत्वावर लस पुरवठा करण्याची ऑफर भारत सरकारला दिली आहे. त्याबाबत भारत सरकारशी चर्चा सुरू असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. कोणताही आर्थिक फायदा न कमावता लसीचा पुरवठा करण्यासाठी फायझर कंपनी पुढे आली आहे. यावर आता भारत सरकार काय निर्णय घेते हे महत्त्वाचे आहे.
भारत सरकारने सुरू केलेल्या व्यापक लसीकरणाच्या कार्यक्रमाला बळकटी मिळावी असे फायझर कंपनीचे म्हणणे आहे. यावेळी कंपनीने असे सांगितले की, सरकारच्या लसीकरणाच्या कार्यक्रमासंबंधी कंपनीचे काही वेगळी धोरणे आहेत. त्यामुळे भारतात नफा न घेता कोरोनाच्या लसी पुरवण्याचे कंपनीने ठरवले आहे. विकसित, विकसनशील आणि मागासलेल्या देशांसाठी फायझरच्या लसींच्या किंमती वेगवेगळ्या ठेवण्यात असल्याचेही कंपनीने सांगितले.
https://twitter.com/ReutersIndia/status/1385145087861084169?s=20