नवी दिल्ली – अमेरिकन राष्ट्रपतींची तसेच त्यांच्या निवासस्थान व्हाईट हाऊसच्या सुरक्षेविषयी अत्यंत कडक उपाययोजना करण्यात येते. विशेष म्हणजे येथील सिक्रेट सर्व्हिस एजन्सी (सुरक्षा गुप्तहेर सेवा एजंट ) यांच्या ताब्यात असून अमेरिकन राष्ट्रपतींना अभेद्य सुरक्षा पुरविणारे खास पथक आहे. परदेश दौर्यावरही त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी या पथकावर आहे.
अमेरिकन अध्यक्ष विल्यम मॅककिन्ले यांच्या हत्येच्या घटनेनंतर सीक्रेट सर्व्हिसला अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या संरक्षणाची जबाबदारी देण्यात आली. १९०० मध्ये संसदेनेही यासंदर्भात एक विधेयक मंजूर केले. कालांतराने त्याचे कामही विस्तृत झाले. सिक्रेट सर्व्हिस काय करते आणि त्याचे एजंट कसे काम करतात, राष्ट्राध्यक्षांची सुरक्षा, त्यांची पद्धत काय आहे, तिची वैशिष्ट्ये काय आहेत हे जाणून घेऊ या…
गुप्त सेवा सुरक्षा मिशन
अमेरिकन गुप्तहेर सेवा सुरक्षा मिशनमार्फत आतापर्यंत अमेरिकेत आलेल्या सुमारे ३०२ विदेशी अतिथींचे संरक्षण केले गेले. तसेच सुरक्षा माहितीकरिता ४५ देशांमध्ये प्रवास केला. ही व्यवस्था व्हाईट हाऊस सह
अमेरिकेतील न्याय व कायदेशीर अधिकारी, शाळा, सुरक्षा भागीदार आणि विविध समुदाय यांच्याशी संपर्क साधून सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या हिंसाचारापासून नेते व लोकांचे संरक्षण करते.
सर्वोच्च नेत्यांच्या निवासस्थानांची सुरक्षा
अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष किंवा सर्वोच्च नेते यांच्याकडून जेव्हा एखादा समारंभ आयोजित केला जातो, तेव्हाच या सेवेची जबाबदारी गुप्त सुरक्षा सेवेला मिळते. तसेच देशातील सर्वोच्च नेत्यांचे निवासस्थान आणि कार्यालयाच्या सुरक्षेत हे जवान तैनात असतात. वॉशिंग्टन डीसीमधील मोहिमांवर परदेशी मुत्सद्दीच्या सुरक्षेकरिताही तैनात असतात.
राष्ट्राध्यक्षांच्या संरक्षणासाठी
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या संरक्षणासाठी सिक्रेट सर्व्हिस एजन्सीची स्थापना केली गेली. याव्यतिरिक्त, गुप्त सेवा व्हाइट हाऊस, अमेरिकन उच्च सुरक्षा अधिकारी आणि अमेरिकेला भेट देणारे उच्च-प्रोफाईल नेते यांचे संरक्षण देखील करते. सीक्रेट सर्व्हिस एजंट्स आधीपासूनच अमेरिकेच्या अध्यक्षांशी संबंधित धमक्या आणि धमकींचे मूल्यांकन करतात. राष्ट्राध्यक्षांचा घरी मुक्काम असल्यावर हे गुप्तहेर एजंट सकाळी चहापानापासून ते त्यांच्या मॉर्निंग वॉकपर्यंत सर्व स्तरांवर त्यांना संरक्षण प्रदान करतात. २०१७ च्या आकडेवारीनुसार, गुप्त सेवा एजंटांच्या कामकाजावर 75 दशलक्ष डॉलर्स खर्च झाले.