मुंबई: अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांना देखील कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: यासंदर्भात ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोना झाल्याची माहिती कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत ट्रम्प यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे की, माझे मित्र डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलेनिया लवकर बऱ्या व्हाव्यात. त्यांना चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा.
तसेच कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की, मी आणि माझी पत्नी मेलेनियाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. आम्ही तात्काळ क्वारंटाईन झालो आहोत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सकाळी आठ वाजेच्या सुमारास ट्विट करत आपल्या सल्लागार होप हिक्सला कोरोनाची लागण झाली असल्याचं सांगितलं होते.त्याचप्रमाणे आपण क्वारंटाईन होत असल्याची माहिती दिली होती. ‘अजिबात विश्रांती न घेता सतत काम करणाऱ्या होप हिक्सचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
कोरोनाचा फैलाव ज्यावेळी सुरु झाला होता. त्यावेळी ट्रम्प अनेक सार्वजनिक कार्यक्रमात मास्क घालत नव्हते. त्यांनी म्हटलं होतं की, मास्कची मला गरज वाटत नाही. मात्र नंतर त्यांनी मास्कचा वापर करायला सुरुवात केली होती. चीनमधून सुरु झालेल्या कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला. जगात सर्वात जास्त रुग्णसंख्या ही आजघडीला अमेरिकेत आहे. तसेच कोरोनामुळं सर्वाधिक मृत्यू देखील अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत कोरोना महामारी संक्रमणाचा मोठ्या प्रमाणात पहिला होत असताना या भयानक हजारापासून अमेरिकन जनतेच्या जीव वाचवण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हायड्रोक्लोरिक या औषधाचा वापर सुरू केला होता तसेच या औषधाचे भारतातून आयात करण्यात आली होती.