नवी दिल्ली – अमेरिकेच्या व्हाइट हाऊसबद्दल कदाचित आपल्याला कदाचित माहिती नसेल. माजी राष्ट्रपती रुझवेल्ट यांनी त्याला व्हाइट हाऊस असे नाव दिले असून अमेरिकेचे राष्ट्रपती भवन हे जगातील महासत्तेच्या प्रमुखांचे घर आहे. याखेरीज त्यांचे कार्यालयही आहे. त्याचा इतिहास देखील अत्यंत रंजक आहे. एका युद्धाच्या वेळी ब्रिटनने एकदा त्या हाऊसला आग लावली होती. अमेरिकन अध्यक्षांच्या या निवासस्थानाचा इतिहास जाणून घेऊ या…
१७९२मध्ये पायाभरणी
अमेरिकेचे पहिले अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांनी १७९१ मध्ये निवासस्थान प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रथम हे स्थान निवडले. त्याची पायाभरणी १७९२ मध्ये झाली. हे घर मूळचे आयरिश आर्किटेक्ट जेम्स होबन यांनी डिझाइन केले होते. जॉन अॅडम १८०० मध्ये प्रथमच या इमारतीत आपल्या पत्नीबरोबर राहण्यासाठी आले होते. परंतु, या इमारतीचे बांधकाम तोपर्यंत पूर्ण झालेले नव्हते. त्यानंतर १८१२ मध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर ब्रिटनने या भव्य इमारतीला आग लावली. यानंतर, पुनर्बांधणीचे काम जेम्स होबन यांच्यावर सोपविण्यात आले. जेव्हा इमारत जुन्या रूपात मात्र नव्याने उभी राहीली आली, तेव्हा तत्कालीन अध्यक्ष जेम्स मनरो त्यात राहायला आले.
इमारतीचे नाव यांनी ठेवले
जेव्हा अध्यक्ष रुझवेल्ट सत्तेत होते, तेव्हा त्यांनी या इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरू केले. यावेळी राष्ट्रपतींचे कार्यालय, अधिकृत निवासस्थान पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर हलविण्यात आले. त्यानंतर त्यांनी स्वतः 1901 मध्ये या इमारतीचे नाव व्हाइट हाऊस असे ठेवले. पुढे दुरुस्तीच्या 50 वर्षांनंतर ही इमारत पुन्हा कमकुवत होत असल्याचे दिसून आले. त्यानंतर दुरुस्तीची गरज पुन्हा जाणवली. यावेळी ही जबाबदारी तत्कालीन अध्यक्ष हॅरी ट्रुमन यांनी आर्किटेक्ट लॉरेन्झो विन्स्लो यांना दिली होती. या इमारतीचे नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर 1952 ट्रूमन या इमारतीत आपल्या कुटूंबासह राहण्यासाठी परत आले.
आत्तापर्यंतच्या सर्व राष्ट्रपतींची चित्रे
या इमारतीच्या भिंतींवर जॉन अॅडमपासून आत्तापर्यंतच्या सर्व राष्ट्रपतींची चित्रे आहेत. त्याच्या तळ मजल्यावर एक सेवा विभाग आहे. तसेच जागतिक नेत्यांच्या करमणुकीसाठी स्वतंत्र स्थान आहे. अमेरिकन इतिहासाविषयी माहिती देण्यासाठी एक संग्रहालय देखील आहे.
एवढ्या आहेत खोल्या
या इमारतीत १३२ खोल्या, ३५ बाथरूम आहेत. त्याशिवाय येथे ४१२ दरवाजे, १४७ खिडक्या, ८ पक्के जीने आणि तीन लिफ्ट आहेत. येथे एकच वेळी सुमारे १४० अतिथींसाठी भोजन तयार केले जाऊ शकते. आणि तितकेच लोक जेवणासाठी बसू शकतात. इमारतीसमोर भव्य लॉन्स आणि आकर्षक गार्डन देखील आहे. अमेरिकन इतिहासात याला बर्याच वेळा राष्ट्रपति महल आणि प्रेसिडेंट हाऊस म्हटले गेले आहे. याशिवाय काही वेळा याला कार्यकारी हाऊस म्हटले गेले आहे.