न्यूयॉर्क – अमेरिकन अध्यक्षपदाचा फैसला अद्याप लागला नसून डोनाल्ड ट्रम्प आणि ज्यो बायडेन यांच्यातील चुरस अतिशय रंगतदार अवस्थेत पोहचल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी बायडेन यांनी आघाडी घेतली आहे. अध्यक्षपदाचा फैसला लागत नसल्याने काही राज्यांमध्ये तणावाची स्थिती आहे. संपूर्ण जगाचे लक्ष या निवडणुकीककडे लागले आहे. टपाली मतदानाची मतमोजणी अद्यापही सुरू आहे. ती जोपर्यंत पूर्ण होत नाही तोवर निकाल लागणे शक्य नसल्याचे सांगितले जात आहे. मुख्य लढत रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प तसेच डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांच्यात आहे. उपराष्ट्राध्यक्षपदासाठी कमला हॅरिस आणि रिपब्लिकनचे माइक पेन्स रिंगणात आहेत.
दरम्यान, दोन्हीही उमेदवारांनी विजयाचा दावा केला आहे. हातात आलेल्या ताज्या माहितीनुसार, बायडेन यांना २२४ तर ट्रम्प यांना २१३ मते मिळाली आहेत. विजयासाठी २७० मतांची आवश्यकता आहे.
अमेरिकेचे सर्व सूत्र पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे येणार की बाइडेन अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमेरिकेच्या काही भागात मतदान अंतिम टप्यात असून काही ठिकाणी मतमोजणी सुरू झाली आहे. अमेरिकेच्या ४५व्या राष्ट्राध्यक्ष पदाचा मान कोणाला मिळणार यासाठी सर्वजण वाट पाहत आहेत.
सर्वोच्च पदाच्या लढतीत एकीकडे पूर्व राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहेत तर दुसरीकडे त्यांचे प्रतिस्पर्धी डेमोक्रॅटिक पार्टीचे उमेदवार बाइडेन. मतमोजणीची प्राथमिक माहिती समोर येण्यास सध्या सुरुवात झाली आहे. वॉशिंग्टन, ओरेगन, कॅलिफोर्निया आणि इलिनोइस याठिकाणी जो बाइडन यांचा विजय झाला असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे. आतापर्यंत जो बाइडन यांना ६३,४२५,०४० तर डोनाल्ड ट्रम्प यांना ६१,८४७,२४६ मत मिळाले आहेत.
११६ वर्षांची परंपरा खंडित होणार
१९०४च्या निवडणुकीपासून मतदान झालेल्या दिवशीच्या रात्रीच अध्यक्ष कोण याचा कल कळतो. खासकरुन फ्लोरिडा राज्यात ज्यास पाठिंबा मिळतो तोच अध्यक्ष होतो, असा आजवरचा ट्रेण्ड आहे. मात्र, यावेळी अधिक वेळ लागू शकतो. टपाली व प्रत्यक्ष मतदानाची मोजणी होण्यासाठी लागणारा वेळ पाहता ११६ वर्षांत प्रथमच मतदानाच्या दिवशी रात्री देशाचा अध्यक्ष कोण हे स्पष्ट होणार नाही.
हार पचवणे कठिण – डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेच्या जनतेला धन्यवाद देत डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केले आहे, सद्य स्थितीला आम्ही चांगल्या स्थिती आहोत, अमेरिकेत मतदान सुरु आहे, सर्वानी मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच काही ठिकाणी मतमोजणी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. माझ्यासाठी जिंकणे सोपे आहे मात्र हार पचवणं कठीण आहे अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.
विक्रमी मतदानाची नोंद
राष्ट्राध्यक्षपदासाठी यंदा विक्रमी मतदानाची नोंद झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार २०१६ च्या निवडणुकीपेक्षा जास्त मतदान यंदा झाले आहे. १० कोटी अमेरिकन नागरिकांनी निवडणुकीआधीच पोस्टल मतदानाद्वारे आपले मत नोंदवले आहे. यामुळे यंदा विक्रमी मतदान झाले असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. रिपब्लिकनचे उमेदवार डोनाल्ड ट्रंप दुसऱ्यांदा जिंकणार की डेमोक्रेटचे उमेदवार जो बायडन बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.