नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. त्यामुळेच त्यांना येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आला. आता त्यांना थकवा आणि अंगदुखीचा त्रास होत आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, त्यांच्या कोविड१९ च्या परीक्षणात कोविडचा संसर्ग आढळला नसल्याचे रूग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले आहे.