नवी दिल्ली – पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना शह देण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळेच तृणमूलला मोठे खिंडार पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. अमित शहांच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या तब्बल १० जणांनी भाजपत प्रवेश केला आहे. आता येथून पुढे जेव्हा जेव्हा अमित शहांचा बंगालमध्ये दौरा होईल तेव्हा तृणमूलचे नेते भाजपत आणले जाणार आहेत.
पुढील वर्षी मार्चपर्यंत तृणमूलमध्ये मोठी पडझड होण्याची शक्यता आहे. कारण शुभेंद्रू अधिकारी यांनी पक्ष बदलण्यापूर्वीच टीएमसीचे दोन आमदार आणि दोन खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचे पक्षाचे सूत्रांनी सांगितले. आता अधिकारी हे भाजपमध्ये आल्यानंतर ही संख्या आणखी वाढेल. यामुळे टीएमसीच्या राज्यात त्याच्याच पक्षाचे जहाज खरोखर बुडणार आहे असा कार्यकर्त्याचा समज निर्माण होईल, असे दिसत आहे.
अनेक वेळा भेट देणार
भाजपच्या रणनीतीचा एक भाग म्हणून शनिवारी शहा यांच्या पहिल्या दौऱ्यात सात आमदार-खासदार पक्षात सहभागी झाले. तसेच निवडणुकीची अधिसूचना जारी होईपर्यंत गृहमंत्री शहा बंगालला अनेक वेळा भेट देतील. त्यापैकी जानेवारीत त्यांच्या दोन भेटी होतील आणि त्यानंतर त्यांची संख्या आणखी वाढेल. प्रत्येक दौर्यामध्ये अन्य पक्षांच्या बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल, याकरिता अन्य पक्षाचे काही नेतेही संपर्कात आहेत. यात डाव्या पक्ष आणि कॉंग्रेसमधील आमदारांचा समावेश आहे.
जबाबदारी वाटप
प. बंगाल राज्यात सध्या भाजप आणि टीएमसी यांच्यात जोरदार शक्ती स्पर्धा सुरू आहे. टीएमसीमधून भाजपमध्ये आलेले आयाराम गयाराम व इतर प्रत्येकाला तिकीट मिळणार नाही. तसेच इतर पक्षांचे नेते मोठ्या संख्येने भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर असंतोषही निर्माण होईल, असे काही भाजप नेत्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष बदललेल्या खासदारांना याची हमी देण्यात आली आहे. निवडणुकीनंतर त्यांना काही जबाबदारी देण्यात येईल.