मुर्शिदाबाद ः पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात निमटीटा रेल्वे स्थानकावर अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या बॉम्ब हल्ल्यात तिथले मंत्री जाकीर हुसेन गंभीर जखमी झाले आहेत. मंत्र्यांसह त्यांच्यासोबत असलेले इतर दोन व्यक्तीसुद्धा या हल्ल्यात जखमी झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज बंगाल दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला हा हल्ला झाल्याने कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे,
जाकीर हुसेन यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असून स्थिर आहे, असं मुर्शिदाबाद वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक अमिय कुमार बेरा यांनी सांगितलं. त्यांच्या एका हाताला व पायाला जखमा झाल्या आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी कोलकाता इथं हलवण्यात आलं आहे.
निमटीटा रेल्वे स्थानकावर झालेल्या बॉम्ब हल्ल्याचा मी निषेध करतो, असं रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्यांची प्रकृती लवकर बरी होण्यासाठी मी प्रार्थना करतो, असंही ते म्हणाले.
https://twitter.com/ANI/status/1362221304422625283