अमिताभ यांची कोरोनावर मात; अभिषेक हॉस्पिटलमध्येच
मुंबई – अभिनेता अमिताभ बच्चन यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळेच रविवारी सायंकाळी त्यांना हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले आहे. तशी माहिती त्यांनीच ट्विटरद्वारे दिली आहे. मात्र, त्यांचे चिरंजीव व अभिनेता अभिषेक हे अद्यापही हॉस्पिटलमध्येच असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.