मंत्री श्री. पाटील यांनी लता बन्सोले यांच्या धाडसाचे कौतुक केले. महिला आज सर्वच क्षेत्रांमध्ये आघाडीवर असून त्या धाडसातही मागे नाहीत हे श्रीमती बन्सोले यांनी पुन्हा एकदा सिध्द केल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. त्या जळगाव जिल्ह्यातील असल्याने आपल्याला विशेष आनंद झाल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले. यावेळी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे सहसंचालक भीमराव कोरे व सुरक्षा पर्यवेक्षक प्रांजली जाधव उपस्थित होते.