अमरावती – कोरोनाचा प्रादुर्भाव थांब नसल्याने येथील लॉकडाऊन आणखी ७ दिवसांसाठी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी २२ फेब्रुवारीपासून १ मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहिर करण्यात आला होता. मात्र, परिस्थितीत कुठलीही सुधारणा होत नसल्याने लॉकडाऊन कायम केला जाणार आहे.
लॉकडाऊन असतानाही गेल्या ५ दिवसात अमरावतीमध्ये तब्बल ४०६१ कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यात ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अमरावती शहरासह अचलपूर शहर आणि अंजनगाव सूर्जी शहरात येत्या ८ मार्च पर्यंत सकाळी ६ वाजेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे.
लॉकडाऊन असूनही रुग्ण कसे आढळत आहेत, याचा शोध आता प्रशासनाकडून घेतला जात आहे. लॉकडाऊन आठवड्याभरासाठी वाढविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जाहिर केला आहे. जीवनावश्यक वस्तूंना मात्र लॉकडाऊनमधून सूट असेल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.