नाशिक – अभोणा पोलिस स्थानकात दाखल गुन्हयात फिर्यादी व इतर आरोपींनाा अटक करुन जामीन मिळवण्यास मदत करण्यासाठी १५ हजाराची लाच घेतांना हवालदार परशराम लक्ष्मण गांगोडे रंगेहाथ सापळयात अडकले. लाच लुचपत प्रतिबंध विभागाने हा सापळा रचला होता. गांगोडे विरोधात अभोणा पोलिस स्टेशन येथे भ्रष्टाचारा प्रतिबंध कायद्याने गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. गांगोडे यांनी तक्रारदाराकडे २० हजाराची लाच मागितली होती. पण, तडजोडी अंती १५ हजार मागणी केली व ती स्विकारली. त्यामुळे त्यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला.