गाझियाबाद (उत्तर प्रदेश) – गाझियाबादला लागून असलेल्या मोदीनगरमध्ये सरकारी कर्तव्य बजावणाऱ्या आयएएस अधिकारी सौम्या पांडे या अवघ्या दोन आठवड्यांच्या बाळाला घेऊन ऑफिसमध्ये कार्यरत झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचे सध्या देशभर कौतुक होत आहे. सोशल मीडियावर त्यांच्या फोटोंवर आणि व्हिडिओंवर भरभरून कमेंटद्वारे प्रतिक्रिया देत आहेत.
कुटुंबासमवेत देशसेवा देखील तेवढीच महत्वाची असल्याचे सौम्या पांडे म्हणाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय कन्या दिनानिमित्त आपल्या २४ दिवसांच्या मुलीसोबत कार्यालयीन काम करण्याऱ्या मोदीनगर उपविभागीय अधिकारी सौम्या पांडे यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर होत आहे.
आयएएस सौम्य पांडे एक वर्षांपूर्वी मोदीनगरच्या उपजिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्या आहेत. मोतीलाल नेहरू नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून बीटेकमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये सुवर्णपदक मिळवल्यानंतर सौम्या पांडे यांनी पहिल्या प्रयत्नात आयएएस परीक्षेत प्रथम दहामध्ये स्थान मिळवले. मुलीच्या जन्मानंतर अवघ्या १५ दिवसातच त्या कामावर रुजू झाल्या आहेत. त्यांच्या कर्तव्यदक्ष कारभाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.