वॉशिंग्टन – जगातील अनेक देशांच्या राजकारणात स्थानिक लोकांना प्राधान्य दिले जात असताना मूळच्या भारतीय वंशाच्या अनेक व्यक्तींनी आता तेथे स्थायिक झालेल्या देशातील राजकारणात स्थान मिळावले आहे. विशेषतः अमेरिका आणि इंग्लंडसह १५ देशांमध्ये भारतीय वंशाच्या २०० हून अधिक व्यक्ती आघाडीवर आहेत. यापैकी ६० कॅबिनेट पदे आहेत.
परदेशी भारतीयांमध्ये काम करणाऱ्या अमेरिकेतील एका संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही शुभवार्ता पहिल्यांदाच समजली आहे. सरकारी वेबसाइट्स व इतर उपलब्ध सार्वजनिक स्रोतांकडून मिळालेल्या माहितीनुसार जगभरातील १५ देशांमध्ये सर्वाधिक लोकसेवक असणार्यामध्ये मूळ (प्रवासी ) भारतीय समूहाचे सुमारे २०० हून अधिक व्यक्तींचा या यादीमध्ये समावेश आहे. विशेष म्हणजे यापैकी ६० हून अधिक नेते विविध मंत्रिमंडळात आहेत.










