मुंबई – भारतातील सर्वांत लांब मालगाडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या शेषनाग आणि सुपर एनाकोंडा या गाड्या आता भारताच्याही पलीकडे म्हणजे देश विदेशात लोकप्रिय होऊ लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी रेल्वे बोर्डाच्या ऑनलाईन व्याख्यानात दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गौतम बॅनर्जी यांनी चार रॅक एकत्र जोडून चालविण्यात येणाऱ्या मालगाडीचे तंत्रही समजावून सांगितले. व्याख्यानात सहभागी झालेले अमेरिका व इंग्लंड येथील प्रतिष्ठीत संस्थांचे इंजिनीअरदेखील हे तंत्र एकूण चकित झाले. कौतुकासाठी त्यांच्याकडे शब्द नव्हते.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे झोनच्या नागपूर डिव्हीजनमधून कोरबासाठी शेषनाग मालगाडी पहिल्यांदा घधावली होती. २५१ वॅगन असलेल्या या गाडीची लांबी २.८ किलोमीटर आहे. व्याख्यानात याची माहिती मिळताच अमेरिकेचे इलेक्ट्रीकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स संस्थान न्यूयॉर्क, इंग्लंडचे इंटरनॅशनल रेल्वे एक्रुटमेंट एक्झीविशन व भारतातील इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट आफ इलेक्ट्रीकल इंजिनियरिंग नाशिक येथील अभियंते व तज्ज्ञ चकीत झाले. जुलै २०१३ मध्ये पहिल्यांदा दोन मालगाड्या जोडून ११८ वॅगनची लांब ट्रेन तयार करण्यात आली होती. त्यात पुढेही सातत्याने सुधारणा होत गेली. त्याचा परिणाम म्हणून २ जुलै २०२० ला सर्वांत लांब ट्रेन शेषनागच्या रुपात आकाराला आली. या मालगाड्यांना तीन ते चार इंजीन ओढायला लागतात. सर्वांचे नियंत्रण पुढे असलेल्या इंजीनवर अवलंबून असते. वायरलेस कंट्रोल सिस्टीमने चालणाऱ्या इंजिनला सेंसर लावण्यात आले आहे. सर्वांत पुढे असलेल्या इंजीनमधून मिळालेल्या कमांडवर सर्व इंजिन काम करीत असतात. कौन बनेगा करोडपती या शोमध्ये महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील एका स्पर्धकाला या गाडीशी संबंधित प्रश्न विचारला होता, हे विशेष.
असे नियंत्रीत होतात इंजिन
३२ नोज (गेअर)वाले इलेक्ट्रीक इंजिनमध्ये असे पाच बिंदू असतात ज्यावर संपूर्ण इंजिन नियंत्रित होत असते. यात ब्रेत सिलींडर (बीसी), ब्रेक पाईप (बीपी), मेन रेजर वायर (एमआर), फ्लो पाईप (एफपी) व एयर फ्लो (एएफ) याचा समावेश आहे. यात पाच वेगवेगळे सेंसर लावण्यात येतात. त्यांना ड्राईव्ह इंटरफेस युनीट (डीआययू) म्हटले जाते. मुख्य इंजीनच्या कॅबीनमधून दिलेल्या कमांडवर मागील इंजिनला नियंत्रीत केले जाते.