गुरूवार, सप्टेंबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अभिमानास्पद! नाशिकच्या गिर्यारोहकाने शोधून काढला रामगड किल्ला

by Gautam Sancheti
जानेवारी 1, 2021 | 5:37 am
in संमिश्र वार्ता
0
IMG 20201231 WA0006

नाशिक – येथील गिर्यारोहक सुदर्शन कुलथे यांनी धुळे जिल्ह्यातील लळिंग किल्ल्याच्या पर्वतरांगेतील अप्रकाशित ‘रामगड’ किल्ल्याचा शोध घेतला आहे. धुळे तालुक्यातील सडगाव येथे असणारा रामगड हा केवळ धार्मिक डोंगर नसुन तो एक गिरीदुर्ग आहे हे शोधमोहिम घेऊन प्रकाशात आणले आहे.

काही वर्षांपूर्वी लळींग किल्ल्याच्या भटकंती दरम्यान याच पर्वतरांगेत एक धार्मिक डोंगर असून त्यावर पाणी आहे, अशी जुजबी माहिती स्थानिक व्यक्तींकडून मिळाली होती. त्यानंतर कुलथे यांनी नकाशे, प्रत्यक्ष भेट आणि अधिक अभ्यास करून या डोंगराचे नाव रामगड असून हा किल्ला असल्याचे निदर्शनास आणून महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांच्या यादीमध्ये एका किल्ल्याची भर घातली आहे.

IMG 20201231 WA0004

भोगोलिक स्थान

रामगडाचे भौगोलिक स्थान 20.795850 N, 74.647155 E असे आहे. धुळे शहराला लागून असलेल्या लळिंग किल्ल्यापासून पश्चिमेकडे ११ कि.मी. अंतरावर असलेले सडगाव किंवा हेंकळवाडी ही रामगड किल्ल्याच्या पायथ्याची गावे आहेत. किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी मालेगावहून करंजगव्हाण – दहिदी – अंजनाळे – सडगाव असा देखिल मार्ग आहे. किल्ल्याची समुद्रसपाटी पासून उंची १९६० फूट (५९७ मी.) असून किल्ला चढाईला सोप्या श्रेणीतला असून अगदी अर्धा तासात गडमाथा गाठता येतो.

पाण्याचे टाक

रामगडाच्या खालच्या टप्प्यावर तसेच गडाच्या सर्वोच्च ठिकाणी पीराचे स्थान आहे. रामगडावर तीन खडक खोदीव पाण्याची टाकी आहेत. पैकी दक्षिणेकडे १६ फूट लांब आणि १६ रूंद असे भले मोठे कातळात खोदलेले पाण्याचे टाके आहे. उत्तरेकडे दुसरे पाण्याचे खोदीव टाके आहे. हे २४ फूट लांब तर ८.५ फूट रूंद आहे. हे सुमारे ७ फूट खोल असून त्यातील पाणी पिण्याजोगे आहे. गडमाथ्यावरील पश्चिम दिशेला पाण्याचे तिसरे खोदीव टाके आहे. परंतु हे टाके सहजपणे दृष्टीस येत नाही. हे टाके अतिशय तीव्र उतारावर खोदलेले असून टाक्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि टाक्यातील पाणी काढण्यासाठी सावधानतेने हालचाली कराव्या लागतात. हे टाके १६ फूट लांब, ८.५ फूट रूंद तर सुमारे ६ ते ७ फूट खोल असून पाणी पिण्याजोगे आहे. या तिन्ही टाक्यांच्या काठावर गोलाकार कोरीव खड्डे दिसून येतात. उत्तरेकडे गडमाथ्याच्या सर्वोच्च बिंदूवर दगड रचलेले प्रमुख जोते आढळते. या जोत्यात एका पीरबाबाचे स्थान आहे. गडमाथा आणि परिसरात आपट्याची झाडे मोठ्या प्रमाणावर आढळतात.

एकाच नजरेत हे किल्ले

रामगडावर असणारे प्राचीन पाण्याची खोदीव टाकी, माथ्यावरील जोती यावरून हा एक किल्ला आहे असे दिसून येते. लळिंग पर्वतरांग पूर्व ते पश्चिम पसरलेली आहे. लळिंग रांगेच्या पूर्व टोकावर लळिंग किल्ला आहे तर पश्चिम टोकावर रामगड आहे. रामगडाचे स्थान लक्षात घेतले तर तो बरोबर लळिंग किल्ला आणि गाळणा किल्ला यांच्या मध्यभागी आहे. रामगडापासून सरळ रेषेत अंतर मोजले तर लळिंग १९ कि.मी. तर गाळणा १२ कि.मी. अंतरावर आहे. रामगडाच्या माथ्यावरून कुठल्याही अडथळ्याविना लळिंग आणि गाळणा दोन्ही किल्ले नजरेच्या टप्प्यात येतात. त्यामुळे हे या दोन्ही किल्ल्यामध्ये लक्ष ठेवण्यासाठीचे चौकीचे ठिकाणी असावे.

IMG 20201231 WA0005

इतिहास दुर्लक्षित

रामगडावरून दोन्ही किल्ल्यांवरील संदेश देणे/पोहोचविण्याचे कामही होत असावे असा कयास आहे. रामगडावरील पाण्याची साठवणूक आणि गडमाथ्याचा परिघ याचा अंदाज घेतला तर अगदी जुजबी शिबंदी येथे असावी. ती देखिल फक्त पहारा देणे, चौकी म्हणून वापर करणे यासाठी होती. पीर बाबाचे ठिकाण अंदाजे किती जुने आहे? आणि पीराचे नेमके नांव काय आहे? याविषयी माहिती मिळू शकली नाही. रामगडावर सध्यस्थितीत कुठलेही हिंदू देवता, मंदीर, समाधी नाही. तरीही गडाचे नाव मात्र रामगड आहे. पंचक्रोशीतील विविध गावांतून माहिती घेतली असता या गडाचे नांव पूर्वीपासूनचे ‘रामगड’ आहे असे कळाले. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार हल्ली दर गुरुवारी लोक येथे दर्शनासाठी येत असतात. त्यातीस अनेक श्रद्धाळू लोक बोकड बळी देऊन नवस करतात. दिवसेंदिवस याठिकाणाची माहिती पसरत जाऊन आता ठिकाणाला लांबलांबून लोक भेटी देण्यासाठी येत असतात. गुरुवार सोडला तर आठवड्याभरात रामगडावर गर्दी नसते.

येथे आहे उल्लेख

नाशिकमधिल प्रसिद्ध इतिहासतज्ञ आणि गिर्यारोहक गिरीश टकले यांचे या शोधमोहिमेसाठी मार्गदर्शन लाभले. रामगड हा गिरीदुर्ग असण्याला त्यांनी दुजोरा दिला आहे. फारूखी सुल्तानांनी लळिंग किल्ला वसवला त्याकाळात ह्या टेहाळणीच्या किल्ल्याची निर्मिती झाली असावी. ब्रिटीश काळातील बंडाच्या वेळी होळकरांच्या कागदपत्रांत याचा उल्लेख सापडण्याची शक्यता वर्तवली आहे. नाशिकचे गिर्यारोहक सुदर्शन कुलथे यांच्यासोबत राहुल सोनवणे, हेमंत पोखरणकर, अविनाश जोशी काका, मनोज बैरागी हे या दुर्ग शोध मोहिमेत सहभागी होते.

IMG 20201231 WA0009

अधिक माहितीसाठी संपर्क –

सुदर्शन कुलथे – विश्वस्त, वैनतेय गिर्यारोहण गिरीभ्रमण संस्था, नाशिक आणि सचिव, नाशिक जिल्हा गिर्यारोहण संघ (अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ अंतर्गत) मोबईल क्रमांक 9422258058

IMG 20201231 WA0008

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आजचे राशीभविष्य – गुरुवार – ३१ डिसेंबर २०२०

Next Post

गरजू आणि गरीब विद्यार्थांसाठी LICची “Golden jubilee ” शिष्यवृत्ती; असा घ्या लाभ

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

01 Sanay Raut Saheb New scaled e1659327045274
महत्त्वाच्या बातम्या

सिंदूर के सन्मान मै, शिवसेना मैदान मै…भारत – पाकिस्तान सामन्याच्या दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन

सप्टेंबर 11, 2025
reliance retail
संमिश्र वार्ता

पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी रिलायन्स फाउंडेशन, वनतारा, रिलायन्स रिटेल आणि जिओकडून मदतीचा हात

सप्टेंबर 11, 2025
VIRENDRA DHURI
संमिश्र वार्ता

‘ओबीसी’ महामंडळांना निधी वाटपात भेदभाव होणार नाही – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे 

सप्टेंबर 11, 2025
sushila kargi
महत्त्वाच्या बातम्या

नेपाळच्या पंतप्रधानपदी पहिल्या मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की? अंतरिम सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरु

सप्टेंबर 11, 2025
G0e W1lXkAAWJGD
महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रव्यापी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक…झाले हे निर्णय

सप्टेंबर 11, 2025
G0f9gZ0aYAAJPQC e1757556321796
मुख्य बातमी

आशिया कपमध्ये भारताची सलामी…पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने यूएईच्या संघाचा ९ विकेट्सने केला पराभव

सप्टेंबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी नवीन कामे व प्रवास टाळावे, जाणून घ्या, गुरुवार, ११ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 10, 2025
IMG 20250910 WA0350 1
स्थानिक बातम्या

शिलापूर येथील सीपीआरआयच्या प्रादेशिक तपासणी प्रयोगशाळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

सप्टेंबर 10, 2025
Next Post
download 2

गरजू आणि गरीब विद्यार्थांसाठी LICची "Golden jubilee " शिष्यवृत्ती; असा घ्या लाभ

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011