मुंबई – मराठी चित्रपट तसेच नाट्य सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अविनाश खर्शीकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ठाण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सौजन्याची ऐशी तैशी, वासूची सासू, लफडा सदन, बाप बिलंदर बेटा कलंदर, तुझं आहे तुजपाशी यांसारख्या नाटकांमधून त्यांनी अविस्मरणीय भूमिका साकारल्या होत्या. तसेच माझा छकुला, राणीने डाव जिंकला, घायाळ, आई थोर तुझे उपकार, किस बाई किस, येडा की खुळा, रणांगण, दे टाळी, माफीचा साक्षीदार, माझा नवरा तुझी बायको, हाऊसफुल्ल, यांसारख्या मराठी चित्रपटांमधून बहारदार अभिनयाने रसिकांच्या मनात घर केले. दामिनी मालिकेतील त्यांची पत्रकाराची गंभीर भूमिका प्रचंड गाजली. चमत्कार चित्रपटातुन बॉलिवूडच्या किंग खान सोबत काम केले होते. हाऊसफुल, माझा नवरा तुझी बायको सारख्या चित्रपटांसाठी त्यांनी कार्यकारी निर्माता म्हणून काम केले होते.