नवी दिल्ली – अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणाचा प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. दरम्यान महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला आव्हान देणार आहे. मुंबई पोलिसांकडे तपास न देता तो सीबीआयकडे देण्यात आल्याचा निर्णय आल्यानंतर त्यावरुन राजकारणही रंगले आहे. बिहार सरकार या प्रकरणात तपास करण्याची शिफारस केली होती. गेल्या काही दिवसापासून हा तपास कोणी करावा याबाबत न्यायालयात वाद सुरु होता. अखेर सुप्रीम कोर्टाने ही जबाबदारी सीबीआयकडे दिली आहे.