नवी दिल्ली – बॉलिवूड अभिनेता सनी देओल आज ६४ वा वाढदिवस साजरा करत आहे. गदर, घायाल आणि बॉर्डरसारख्या चित्रपटातून अभिनयाचा ठसा उमटविणार्या सनी देओल यांनी राजकारणात पाऊल ठेवले आहे. २०१९मध्ये पंजाबमधील गुरदासपूरमधून खासदार झालेला अभिनेता राजकारणात देखील लोकप्रिय ठरले. अभिनेत्याच्या कुटुंबातही बरेच राजकारणी असतात आणि घरातील मालमत्तेमुळे हे कुटुंब बर्याचदा चर्चेत असते.
सनी देओल यांच्या मालमत्तेबद्दल चर्चा केल्यास ते स्वत: कोट्यवधीचे मालक आहेत. २०१९ मध्ये निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार, सनी देओल व त्यांच्या पत्नीच्या नावे ८७.१८ कोटींचे मालक आहेत. तसेच २०१७-१८मध्ये ६३.८२ लाख , २०१६-१७मध्ये ९६.२९लाख तर २०१५-१६मध्ये २.२५ करोड रुपये कमावल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच २६ लाख रुपये रोख असून त्यांच्या पत्नीकडे १६ लाख रुपये आहेत. यापैकी सनी देओल यांच्याकडे बँकेत ९.३६ लाख रुपये आहेत आणि त्यामध्ये १.४३ लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. तसेच, त्याच्याकडे १.६९ कोटींची कार आहे. तसेच १.५६ कोटींचे दागिने आहेत. सनी देओल यांनी १९७७-७८मध्ये बर्मिंघमयेथे अभिनय तसेच थिएटर विषयात डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले आहे.