मुंबई – बॉलिवूडमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असून अनेक अभिनेते आणि अभिनेत्री कोरोना बाधित होत आहेत. रविवारी सकाळीच अभिनेता अक्षय कुमारने कोरोना बाधित झाल्याचे सोशल मिडियात शेअर केले. त्यानंतर रविवारी सायंकाळीच अभिनेता गोविंदानेही माहिती दिली की त्यालाही कोरोनाची लागण झाली आहे. मी विलगीकरणात असून माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी. मी सध्या तरी सुरक्षित आहे. आपण सर्वांनीही काळजी घ्यावी, असे आवाहन गोविंदाने केले आहे.