मुंबई – अभिनेता अक्षय कुमारचा कोरोना रिपोॉर्ट काल पॉझिटिव्ह आल्यानंतर आज तो हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल झाला आहे. तशी माहिती स्वतः अक्षयनेच दिली आहे. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला विलगीकरणात आहे. आवश्यक ती वैद्यकीय व सर्व खबरदारी घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन अक्षयने काल केले होते. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून आज मी हॉस्पिटलमध्ये दाखल होत असल्याचे अक्षयने आज स्पष्ट केले आहे.
— Akshay Kumar (@akshaykumar) April 5, 2021