निर्वाचन अधिकारी प्रा. डॉ. प्रशांत टोपे सर यांनी नाशिक महानगराची कार्यकारिणी घोषित केली. यावेळी बोलत असताना प्रमुख पाहुणे साधूमल जी रुंगठा यांनी विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. युवकांमध्ये राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत ठेवण्यासाठी विद्यार्थी परिषदेची काळाला गरज आहे असं देखील मत त्यांनी मांडले. अभाविप राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा.डॉ. प्रशांत साठे सर यांनी विद्यार्थी परिषदेच्या कामाची व राष्ट्रवादाची ह्या राष्ट्राला कशी गरज आहे अशी बाजू मांडली. अभाविप नाशिक जिल्हा संयोजक अथर्व कुलकर्णी यांनी शैक्षणिक वर्ष २०१९-२० चे मंत्री प्रतिवेदन केले व संपूर्ण वर्षभरातील कार्यक्रम आंदोलन व कामांचा उल्लेख केला. अभाविपचे नवनिर्वाचित महानगर मंत्री सिद्धेश खैरनार यांनी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ ची आगामी दिशा मांडली. नाशिक महानगरातील प्रत्येक महाविद्यालयावर विद्यार्थी परिषदेची शाखा स्थापन करणार व समाजातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत विद्यार्थी परिषदेचा विचार पोचवणार असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे कार्यक्रम प्रमुख ओम माळुंजकर होते. सुत्रसंचालन प्रियंका पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन सौरभ धोत्रे यांनी केले.
अभाविप नाशिक महानगराची कार्यकारणी खालील प्रमाणे आहे.
नाशिक महानगर कार्यकारिणी
महानगर अध्यक्ष :- प्रा.डॉ.नरेंद्र देशमुख
महानगर मंत्री :- सिद्धेश खैरनार
महानगर सहमंत्री :- ओम माळुंजकर
:- सौरभ धोत्रे
:- तेजल चौधरी
:- दिव्या सिंग
कार्यालय मंत्री :- रोहित सोनी
जिज्ञासा संयोजक :- शुभांगी निकम
विधी संयोजक :- रितेश निकम
TSVK संयोजक :- वैभव पाटील
Agrivision संयोजक :- नितीन पाटील
SFD संयोजक :- साई घाडगे
SFS संयोजक :- यश मोरे
कलामंच संयोजक :- अक्षय खुळात
जनजाती कार्य प्रमुख :- रवींद्र पवार
सोशल मीडिया प्रमुख :- सचिन शितोळे
अभ्यास मंडळ प्रमुख :- रेवती बेलगावकर
कोष प्रमुख :- प्रथमेश नाईक
व्यवस्था प्रमुख :- वैभव गुंजाळ
सदस्य :-
अथर्व कुळकर्णी
ऐश्वर्या पाटील
रोशनी पवार
धनंजय रासकर
प्रा.डॉ.चेतन जावळे
गीतेश चव्हाण
विराज भामरे