नवी दिल्ली – जगभरातील १० श्रीमंत हस्तींच्या यादीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या एलन मस्क यांनी एका दिवसात कोरोनाच्या चार टेस्ट केल्या असून त्यातल्या दोन निगेटिव्ह आणि दोन पॉझिटिव्ह आल्या आहे. यावर त्यांनी ट्विटरद्वारे प्रश्न उपस्थित केला असून, कोरोना चाचणी होत असताना गडबड होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
‘काहीतरी बोगस काम सुरू आहे, मी आज कोरोनाच्या चार टेस्ट केल्या, त्यातील दोन पॉझिटिव्ह आल्या असून दोन निगेटिव्ह आल्या आहेत, तेच मशीन, त्याच चाचण्या आणि त्याच नर्सने रॅपिड आणि अँटीजन टेस्ट केल्या’ अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे. मात्र, मस्क यांनी सुरवातीपासून कोरोनाचे खंडन केले असून एप्रिल पर्यत अमेरिकेत कोरोनाचा एकही रुग्ण नसेल असे विधान त्यांनी केले होते. मात्र, सध्या अमेरिकेत सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत.
मस्क यांनी दुसर्या एका लॅबमध्ये टेस्ट केली असून त्याचे रिपोर्ट येण्यास २४ तास अवधी आहे. एका युझरने त्यांना लक्षणे विचारली असता, सर्दी खोकल्याचे किरकोळ लक्षणे असल्याचे त्यांनी संगितले.
मस्क यांनी २००२ साली पृथ्वीच्या बाहेर जीवसृष्टी शोधण्यासाठी सुरवात केली. त्यासाठी त्यांनी रॉकेट डिझाईनचे तंत्र आत्मसात केले. सध्या ते स्पेसएक्सचे सीईओ आहेत. मानवी अस्तित्वावर असलेल्या संकटांवर उपाय शोधण्याचे काम त्यांची कंपनी करते आहे.