नाशिक – दक्षिण गंगा असलेल्या गोदावरी नदीचे अनेक जिवंत जलस्त्रोत बुजवून टाकल्याची बाब पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे. रामकुंड परिसरात अवघ्या २० फुटांवर जमिनीखाली पाणीच पाणी असल्याची बाब निदर्शनास येत आहे.
नाशिक स्मार्ट सिटी अंतर्गत सरदार चौक ते रामकुंड दरम्यान सिवर लाईन टाकण्याचे काम ६ महिन्यांपासून सुरू आहे. खोदलेल्या खड्ड्यांतून मोठ्या प्रमाणात पाणी येत असून पुढचे काम १ महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. रोज दिवसा ठेकेदाराकडून मोटर लावून पाणी काढण्यात येते. रात्री पुन्हा पाणी भरते. हा खेळ गेल्या महिन्याभरापासून सुरू असल्याची माहिती गोदावरी प्रेमी आणि स्थानिक रहिवासी देवांग जानी यांनी दिली आहे. या कामामुळे स्थानिक नागरिक गेल्या ६ महिन्यांपासून हैराण झाले आहेत. यानिमित्ताने हे सुद्धा सिद्ध होत आहे की, गोदावरीच्या परिसरात अनेक जिवंत जलस्त्रोत असून ते टिकविणे गरजेचे आहे, असेही जानी यांनी सांगितले आहे.
बघा व्हिडिओ