नाशिक – शहर परिसरात कोरोनाचा प्रादूर्भाव प्रामुख्याने अपार्टमेंट आणि बंगल्यांमध्येच असल्याची बाब समोर आली आहे. मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीयच अपार्टमेंट व बंगल्यात राहत आहेत. त्यांच्याकडूनच कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने संसर्ग वाढत असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. नाशकात सद्यस्थितीत ११८३ अपार्टमेंट आणि ८४७ बंगल्यांमध्ये उपचार घेणारे रुग्ण (अॅक्टिव्ह) असल्याचे महापालिकेने सांगितले आहे. अपार्टमेंटमधील सर्वाधिक कोरोनाबाधित पंचवटीत असून सर्वात कमी सिडकोत आहेत. तर, सातपूरमध्ये १९५ बंगल्यांमधील व्यक्ती कोरोना बाधित आहेत. तर, नाशिक पश्चिम मध्ये केवळ ७४ बंगलेच प्रतिबंधित करण्यात आले आहेत. त्यामुळे अपार्टमेंट आणि बंगल्यात राहणाऱ्या व्यक्ती व कुटुंबांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, कोरोनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
शहरातील आकडेवारी अशी