नाशिक : शहर परिसरात अपघाताचे सत्र सुरूच असून, वेगवेगळया ठिकाणी नुकत्याच झालेल्या अपघातात एक महिला ठार झाली तर तीन जण जखमी झाले. जखमींमध्ये एका पादचारी वृध्देचा समावेश आहे. याप्रकरणी नाशिकरोड, सरकारवाडा आणि मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
एकलहरा येथील सुनिता बापू कावडे (४३) या बुधवारी (दि.३) सायंकाळच्या सुमारास नाशिकरोडच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. एकलहरा परिसरात त्या स्व:ताच्या दुचाकीवरून पडल्याने जखमी झाल्या होत्या. मुलगा शुभव कावडे यांनी तात्काळ जयराम हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी त्यांना मृत घोषीत केले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार चिखले करीत आहेत. रविवार कारंजा परिसरातील नागरेवाड्यात राहणा-या नंदाबाई ताराचंद इमले (६४ रा.दगडू तेली मागे) या वृध्दा २६ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास पेठे हायस्कूल समोरून पायी जात असतांना रविवार कारंजाकडून भरधाव येणा-या एमएच १५ बीई १४०० या दुचाकीने त्यांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात नंदाबाई इमले या जखमी झाल्या असून त्यांचा हात मोडला आहे. याप्रकरणी दुचाकीस्वार बाळासाहेब आहेर यांच्या विरूध्द सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार शेळके करीत आहेत. तर भरधाव अॅटोरिक्षाने दिलेल्या धडकेत प्रशांत मनोहर ठोसर (रा. सावरकरनगर,जेलरोड) व अतुल अशोक पवार (रा.नाशिक) हे दुचाकीस्वार मित्र जखमी झाले. हा अपघात गोविंदनगर परिसरात झाला. दोघे मित्र मंगळवारी (दि.२) सायंकाळच्या सुमारास गोविंदनगर येथील श्रीराम फायनान्स कार्यालया समोरून आपल्या दुचाकीवर (एमएच १५ बीबी ९८०५) प्रवास करीत असतांना मुंबईनाक्याकडून सिडकोच्या दिशेने जाणा-या भरधाव अॅटोरिक्षाने (एमएच १५ ईएच ०३४०) दुचाकीस धडक दिली. या अपघातात दोघे मित्र जखमी झाले असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार आहिरे करीत आहेत.