पेठ – स्वच्छ आणि चकाचक रस्ते… गल्लीबोळात रेखाटलेले रंगीत पट्टे… स्वच्छ सार्वजनिक पाणवठा… चौकाचौकातील गवताचे निर्मूलन… हे सारे चित्र आहे तालुक्यातील करंजखेड या गावचे. गावाचा सारा चेहरामोहराच बदलला आहे. त्यामुळेच ते अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
पेठ-सुरगाणा तालुका जनसेवा मंडळाच्या वतीने ग्राम सफाई व सच्छता अभियान समवेत ग्राम सुशोभिकरणाची मोहिम हाती घेण्यात आली आहे. यामध्ये ग्रामस्थांच्या सहभागातून गावोगावी स्वच्छता बाबत जनजागृती केली जात आहे. करंजखेड या अतिदुर्गम गावापासून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे. दररोज सकाळी गावातील ग्रामस्थ व जनसेवा मंडळाचे सदस्य हातात झाडू घेऊन गाव स्वच्छ करतात.
रस्त्यावर गतिरोधक बसवण्यात आले असून त्यांनाही पांढरे पट्टे मारण्यात आले आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे. टप्प्याटप्प्याने ही मोहिम पेठ व सुरगाणा तालुक्यातील गावागावात राबवण्यात येणार असल्याचे जनसेवक कमलेश वाघमारे यांनी सांगितले आहे.
मोहिम शाभारंभप्रसंगी हनुमंत वाघमारे, कमलेश वाघमारे, मनोहर जाधव, दिलीप महाले, रोहित राऊत, रघुनाथ घोरपडे, कमलाकर गवे, सिताराम घोरपडे, धनाजी लहरे,भाऊराव गवे,पंडित गवे,राहुल शेवरे,कैलास गवे, पंढरीनाथ भडांगे,परसराम मुकणे, विष्णू पवार, जयश्री भडांगे, रोहिणी घोरपडे, यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते.