जमिनीवर चालणारे निवटी मासे
भूतलावर अनेक चित्र विचित्र प्राणी पाहायला मिळतात. माशांच्या विश्वात निवटी हा मासा चक्क जमिनीवर चालतो. खरंतर मासे हे पाण्यात पोहतात.परंतु या माशांमध्ये पोहण्यासाठी असलेले पर जे असतात त्यांचे रूपांतर हातापाया सारखे झालेले असते. त्यामुळे हे मासे चिखलावर सरपटत पाण्याबाहेर जातात.
दगडावर विसावतात आणि विशेष करून मचूळ पाण्यात पानफुटी च्या जंगलांमध्ये डबक्यात मोठ्या प्रमाणात आढळतात. या माशांच्या डोक्यावर दोन मोठे गोलाकार बाहेर आलेले डोळे असतात. निवटी मासा भारतीय महासागरात सर्वत्र सापडतो. जेव्हा सागरी किनाऱ्यावरील पाहण्यास ओहटी लागते तेव्हा हे मासे छोट्या छोट्या पानफुटी च्या दलदलीच्या काठावर येऊन बराच वेळ घालवतात. अशा स्थितीत हे मासे आपल्या शेपटीचे टॉक पाण्यात बुडवून ठेवतात.
या माशांना कोणी त्रास दिला तर ते पुढच्या डबक्यात पटकन उडी मारतात. कधीकधी ही उडी दोन फुटाची असते. ते पाण्याच्या पृष्ठभागावर ही अशा पद्धतीने उड्या मारतात. या जातीचे मासे बारा सेंटीमीटर लांबी पर्यंत वाढतात. या माशांचे पुढचे पर बाहू सारखे असून त्यांना अत्यंत बळकट स्नायू जोडलेले असतात. त्यांचा उपयोग चक्क चालण्यासाठी केला जातो. हे मासे पाण्यातच स्वशन करतात. ते ऑक्सिजन दोन प्रकारे शोषून घेतात.
या माशांच्या कल्याच्या खोलगट जागेत पाणी भरलेले असते. त्यानंतर मासा पाण्याबाहेर झेपावतो या माशाच्या तोंडात व घशात देखील ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड वायू ची देवाण घेवाण होते. त्याचे कारण म्हणजे या अवयवांमध्ये अत्यंत सूक्ष्म रक्तवाहिन्यांचे जाळे पसरलेले असते. म्हणून पाण्याबाहेर सुरुवातीला कल्याच्या साह्याने स्वशन चालते नंतर कल्ले व घसा हे अवयव हवा घेण्यासाठी त्यांना ओलसर ठेवावे लागतात.
विशेष म्हणजे हे मासे सहज माणसाळतात व त्यांना खाद्य देता येते. या माशांमध्ये असलेले पर उभयचर प्राण्यांमधील बाहू सारखे असतात व हे मासे पाण्याबाहेर ओलसर जागेत बराच काळ घालवतात. म्हणूनच हे मासे म्हणजे उभयचर प्राण्यांचे पूर्वज मानले जातात.