सूर्यमासा
सूर्यमासा हा मोलिडी (Molidae) कुलातील जगातील सर्वात मोठा मासा आहे. त्याला मोला असेही म्हणतात. वैज्ञानिकांनी अलीकडेच या मोहक माशांची पिल्ले शोधली असून ती इतकी लहान असतात की बोटांच्या टोकावर डझनभर पिल्ले मावू शकतात. प्रौढ सूर्यमासे मात्र जगातील अत्यंत वजनदार कास्थी (bony) मासे आहेत. त्यांची लांबी जवळपास तीन मीटर असते आणि वजन दोन हजार किलोग्रॅम पेक्षाही जास्त असते. त्यांचा आकारही अत्यंत विचित्र आणि वेगळाच असतो. काहीसा पसरट, गोल व त्यावर मोठे वरचे पर असते. त्याचे शरीर मात्र माशासारखे लांब निमुळते नसते.
अत्यंत आखूड शरीराला शेपुट व शेपटीचे पर देखील नसते. परंतु या माशांची पिल्ले मात्र वेगळीच असतात. त्यांची लांबी काही मिलिमीटरमध्ये असते. पण ते मोठ्या माशांचे सारखे दिसत नाहीत. त्यामुळे शास्त्रज्ञ ही पिल्ले योग्य प्रजातीच्या मोला माशाशी अनुरूप आहेत की नाही हे शोधत होते .पहिल्यांदाच डीएनए अनुक्रममुळे (DNA sequencing) मोठ्या दणकट डोक्याच्या सूर्य माशाच्या पिलांचा शोध घेण्यात आला. शास्त्रज्ञांना त्यात यश आले. हा मासा ऑस्ट्रेलियन म्युझियममध्ये आहे. मोलीडी कुलात सहा प्रजाती आहेत व त्या जगभरातील महासागरात आढळतात. त्यांच्या विशिष्ट आकारावरून त्यांना तऱ्हेवाईक नावे दिलेली आहेत. त्यांना फ्रेंचमध्ये चंद्रमासा तर डॅनिश भाषेत मोठ्या डोक्याचा मासा म्हणतात .जर्मनभाषेत पोहणारे डोके असेही म्हटले जाते.
या माशांची पिल्ले अत्यंत लहान असून त्यांना शोधणे व ओळखणेही कठीण असते .परंतु 2017 मध्ये न्यू साउथ वेल्स दक्षिणपूर्व ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनार्यावर काम करणाऱ्या संशोधकांनी या माशाच्या पिल्लांना गोळा करण्यात यश मिळविले .त्यांची लांबी फक्त पाच मिलिमीटर होती .अनुवंशिक अनुक्रमांकासाठी अत्यंत काळजीपूर्वक एका पिलाचा डोळा त्यांनी काढला. या पिलास कमीत कमी इजा होईल अशी दक्षता घेतली आणि त्यातून वापरता येईल असे डी एन ए काढण्यात आले .मोठ्या माशांच्या डी एन ए शी पडताळून पाहिले ,त्याची तुलना केली आणि तो नमुना “मोला अलेक्झांड्रीनी ” या माशाशी जुळला. या अत्यंत लहान जीवाची ओळख झाल्यावर तो जीव मात्र पूर्ण वाढ झालेल्या माशापेक्षा सहाशे पटीने लहान होता.
संशोधक या पिलांची पडताळणी किंवा तुलना अनोळखी मोला पिलांशी करीत आहेत. ही पिले ऑस्ट्रेलियात म्युझियम अँड कॉमनवेल्थ सायंटिफिक अँड इंडस्ट्रिअल रिसर्च ऑर्गनायझेशन, होबार्ट ,ऑस्ट्रेलिया येथे आहेत. त्यातील अधिक सारखीच पिलेले आढळतात का? हे पाहणे चालू आहे. हे काम ऑकलंड वॉर मेमोरियल म्युझियमचे वैज्ञानिक मारियन नायगार्ड या पिलांचे परीक्षण करीत आहेत. मोठ्या डोक्याच्या सूर्य माशा प्रमाणे सूर्य माशाच्या आणखी चार प्रजाती ऑस्ट्रेलिया भोवतालच्या समुद्रात आढळतात. त्यात सागरी सूर्य मासा(,Mola mola) ,फसविणारा सूर्य मासा ( Mola tecta), बिंदू शेपटीचा सूर्य मासा(Masturus lanceolatus ) आणि चौथा प्रकार म्हणजे लांबट सूर्य मासा(Tanzania laevis ) असे विविध प्रकार आढळतात. सूर्य माशांवरील संशोधनात अत्यंत छोट्या पिलांचा शास्त्रज्ञांना या माशाचे जीवनचक्र जाणून घेण्यासाठी उपयोग होईल. आपल्याला या महासागरातील महाकाय सूर्य माशांचे संरक्षण करायचे असेल तर त्यांचा संपूर्ण जीवन इतिहास समजून घेणे आवश्यक आहे. त्यात पिल्ले कसे दिसतात आणि ते कोठे आढळतात याचाही शोध घेता येईल, असे वैज्ञानिक नायगार्ड म्हणाले.